खोक्याचे घर जाळलं; प्राण्यांचा मृत्यू तर कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप…

बीड : बीडमधील भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले याचे पाडलेलं घर अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना गुरूवारी (ता. १३) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या आगीच्या घटनेमध्ये त्याच्या घरातील काही जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत, या घटनेमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसलेचं घराचं मोठं नुकसान झाले आहे.

वनविभागाने कारवाई करत खोक्या भोसले याचे घर बुलडोझरने पाडले होते. त्यानंतर रात्रीच्या वेळी हे पाडलेलं घर पेटवण्यात आलं आहे. या आगीत जनावरांचा चारा पेटला काही प्राण्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर पेटवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी कोणी लावली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, बीडमधील एक मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर खोक्या भोसले चर्चेत आला होता. त्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले. त्यामध्ये आणखी एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याचा त्याचबरोबर पैसे उडवताना, आणि त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले, सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला खोक्या उर्फ सतीश भोसलेने अनेक वन्य प्राण्यांनाही मारून खाल्ले असल्याचे आणि त्यांच्या अवयवांची तस्करी केल्याची माहिती समोर आली. शिरूर कासार गावात त्याने वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमन करत घरही बांधल्याचे समोर आले. त्याचबरोबर त्याच्या घरामध्ये शिकारीचे साहित्य सापडले होते.

खोक्या भोसले याला बीड पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली, तर दुसरीकडे वनविभागाने त्याच्या घरावर नोटीस धाडली. 48 तासांमध्ये त्याला कोणतंही उत्तर न आल्याने वनविभागाने कारवाई करत खोक्या भोसले याचे घर बुलडोझरने पाडले. त्यावेळी घरातील वस्तू बाहेर आणून ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अज्ञाताने त्याच घर आणि साहित्य पेटवून देण्याचा प्रयत्न केला, त्या घटनेमध्ये त्याच्या घरातील साहित्य आणि जनावरांचा चारा त्याचबरोबर काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

खोक्या सापडला! प्रयागराजमधून सतीश भोसले याला पोलिसांनी केली अटक…

धक्कादायक Video: लातूरमध्ये युवकाला नग्न करून बेदम मारहाण…

खोक्या भाईने पैसे उधळल्यानंतर काय दिलं उत्तर पाहाच…

बीडमध्ये अमानुष मारहाण! ‘खोक्या’ आला समोर अन् सांगितलं…

संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…

वाल्मिक कराड याचा PSI सोबतचा फोन व्हायरल; मी बीड जिल्ह्याचा बाप…

बीड पोलिसांची आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई…

बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!