
हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू…
सातारा : कराड तालुक्यातील गोवारे गावामध्ये असलेल्या विहिरीजवळ असलेल्या फ्युजबॉक्सचा शॉक लागून तुकाराम सदाशिव खोचरे (वय 55) व शहाजी सदाशिव खोचरे (वय 50) या दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तुकाराम आणि शहाजी खोचरे यांची गावच्या भटकी नावाच्या शिवारात शेती आहे. याठिकाणीच त्यांची विहीर होती. या विहिरीला जवळच असलेल्या फ्युजबॉक्समधून विद्युत पुरवठा होता. तुकाराम आणि शहाजी शुक्रवारी (ता. २४) दुपारच्या सुमारास शेतीमध्ये पाणी देण्यासाठी गेले होते. मात्र, दिवसभर ते घरी परतले नव्हते.
दोघेही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांचाही संपर्क होत नव्हता. त्यामुळे सायंकाळी शोधत तुकाराम खोचरे यांचा मुलगा शेताकडे गेल्यानंतर दोघेही फ्युजबॉक्स जवळ मृतावस्थेत निपचिप पडले होते. मुलाने घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देण्यात आला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये गोदामाला आग; सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! पुणे-सोलापूर महामार्गावर दोन सख्या भावांचा अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! डुकरांची शिकार नव्हे तर सख्ख्या भावांचा गेला बळी…
लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापाला कायमचं संपवलं…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

