
सातारा! मैत्रिणीने मुलाच्या नावाने फेक अकाऊंटवरुन केले प्रपोज अन् गेला जीव…
सातारा: एका मैत्रिणीने मुलाच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करी म्हणून मैत्रिणीला ‘फ्रेंड’ केले. मैत्रीण या युवकाच्या प्रेमात पडली. मात्र, युवकाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत (ता. कोरेगाव) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रूतूजा दिलीप पवार आणि तिची मैत्रिण गायत्री भोईटे या दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी, दोघी एकाच कॉलेजमध्ये शिकत होत्या. एकत्र पदवी शिक्षण पूर्ण केले. पण, गायत्रीने रुतूजाची चेष्टा करण्याचे ठरवले. गायत्रीने एका मुलाचे फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवलं आणि रुतूजाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. गायत्री फेक अकाऊंटवरुन रुतूजासोबत रात्रंदिवस चॅट करायची, यामुळे रुतूजाच्या या प्रेमाच्या जाळ्यात दिवसेंदिवस आणखी अडकत गेली. न बोलता न भेटता रुतूजाला आयुष्यातील पहिलं प्रेम मिळाले होते.
रुतूजा त्याच्या प्रेमात चांगलीच अडकली होती. दुसरीकडे गायत्री त्या गोष्टीची मजा घेत होती. गायत्रीने आणखी एक इन्स्टावर अकाऊंट बनवून तिने ते मुलाच्या वडिलांचे असल्याचे दाखवले आणि माझ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे रुतूजाला सांगितले. सोशल मीडियावरून मिळताच, रुतूजाला मोठा धक्का बसला आणि तिने आत्महत्या करण्याचे टोकाचं पाऊल उचलले. तिला तो धक्का सहन झाला नाही आणि तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर पोलिसांनी रुतूजाचा फोन चेक केला असता त्या दोन इन्टावरचे अकाऊंट समोर आले. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने माहिती घेतली असता तिची मैत्रिण गायत्री हीच्याच मोबाईल वरुन हे दोन अकाऊंट तयार झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी गायत्रीला ताब्यात घेतल्यावर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी गायत्रीला आता बेड्या ठोकल्या असून वाठार पोलिस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत. मैत्रिणीची चेष्ठा एवढी महागात पडली की, तिच्यामुळे तिच्याच मैत्रिणीला आपलं आयुष्य संपवावे लागले आहे.
पोलिसकाका Video News: 01 ऑगस्ट रोजीच्या Top 10 बातम्या…
एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…
दाऊद शेख आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला करायचा ब्लॅकमेल…
ऑनर किलिंग! वडील मलाही संपवतील; विद्याचा मन सुन्न करणारा आर्त टाहो…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

