प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रेमविवाहानंतर पत्नीचे कोणाशीतरी प्रेमसंबंध आहेत, या संशयातून नवऱ्याने मुलांसमोरच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना सुलतानपूर येथे घडली आहे. दोघांनी प्रेमविवाह करण्यासाठी 15 वर्षांपूर्वी मोठ्या मेहनतीने कुटुंबीयांचा होकार मिळवला होता. पण, पत्नीचा खून केल्यामुळे त्याची रवानगी कारागृहात होणार आहे. यामुळे त्यांची दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सेऊर गावाजवळील पूर्वांचल महामार्गावर ही घटना घडली आहे. उन्नाव जिल्ह्यातील सफीपूरचा रहिवासी असलेला राहुल मिश्रा हा पत्नी मोनिका गुप्ता आणि दोन मुलांना घेऊन इनोव्हा मोटारीने लखनौवरून रायबरेलीला आपल्या सासरवाडी निघाला होता. मात्र, रायबरेलीला न जाता त्याने पूर्वांचल महामार्गावर रस्त्याशेजारी गाडी उभी केली. दोन्ही मुलांसमोरच त्याने पत्नीचा गळा आवळला. घटनास्थळीच पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहासोबत तो मुलांना घेऊन गाडीतच बसून राहिला होता.’

दरम्यान, महामार्गावर गस्त घालणाऱ्या पथकाने रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही गाडी पाहिली आणि तिचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, राहुल आतून दरवाजे उघडत नव्हता. पथकाला शंका येताच पथकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जबरदस्तीने गाडीचे दरवाजे उघडले. दरवाजे उघडताच बाहेर आलेला मोनिकाचा मृतदेह पाहून पोलीसही हादरले. मोटारीत बसलेल्या 12 वर्षीय मुलीने आणि 5 वर्षीय मुलाने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले. मोनिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

मोनिकाच्या कुटुंबीयांनी राहुल विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. ते म्हणाले, ‘मोनिकाने 2008 साली राहुलशी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीपासूनच राहुल तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दोघांमध्ये त्यावरून भांडणे होत होती. मात्र आम्ही असा कधी विचारही केला नव्हता की, राहुल मोनिकाची हत्या करेल.’ दरम्यान, पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे राहुलवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने मुलीने केली वडिलांना बेदम मारहाण…

प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

इन्स्टाग्रामवर मैत्री झालेली युवती निघाली तृतीयपंथी अन् पुढे…

हृदयद्रावक! मुलीने बेडरूमधील दृष्य पाहून फोडला हंबरडा…

प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!