
पुणे शहरातील महिलेच्या खूनाचा तपास युनिट ५ने २५० सीसीटीव्ही तपासून केला उघड…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात झालेल्या महिलेच्या खुनाच्या गंभीर गुन्हयात कोणताही धागादोरा हाती नसताना गुन्हे शाखा, युनिट ५ ने तपास जलद गतीने व मोठया कुशलतेने हाताळून उघड केला आहे. दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, इतर दोन जबरी चोऱ्यांचे गुन्हेही उघड केले आहेत. युनिट ५ तपास पथकाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
पासलकर चौक ते गंगाधाम चौक या दुहेरी वाहतुकीचे रोडचे पश्चिम बाजुस गोयल गार्डनसमोर रोडचे कडेला असणारे जय संतोषी मॉ आयुर्वेदिक कॅम्प, बिबवेवाडी, पुणे येथील कापडी पालात ९/१२/२०२३ रोजी एक अनोळखी महिला (वय अंदाजे ४०-४५) हिस मारहाण करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले म्हणून अज्ञात व्यक्तीविरुध्द बिबवेवाडी पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि. नं.२५९ / २०२३, भारतीय दंड संहिता कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचे घटनास्थळी युनिट ५, गुन्हे शाखेचे टिमने तात्काळ भेट दाखल गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत वरिष्ठांनी आदेशीत केले, त्याप्रमाणे युनिट -०५, कडील अधिकारी व पोलिस अमंलदार यांनी पोलिस निरीक्षक, युनिट – ०५, गुन्हे शाखा, पुणे शहर महेश बोळकोटगी याचे मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन प्राप्त फुटेजच्या आधारे घटनास्थळापासून ते चाकण पर्यंत साधारण ५५ कि.मी. २४०-२५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. प्राप्त माहितीचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण करता संशयित १) रविसिंग राजकुमार चितोडिया (वय – २९ वर्षे, धंदा – काहीनाही, रा. रवि मस्के याचे पत्र्याचे शेड येवलेवाडी, पुणे व मुळ रा. प्लॉट नं. ८ मध्ये झोपडी, जगन्नाथ अपार्टमेंटजवळ, मुंबई आग्रा रोड, जत्रा हॉटेलच्या बाजुला, वृंदावननगर, आडगाव शिवार, नाशिक) २) विजय मारुती पाटील (वय ३२ वर्षे रा. बिल्डींग नंबर ३, प्लॅट नंबर १०, संजीवनी पोलिस कॉलनी, भोईसर शीगाव रोड, भोईसर पुर्व ता. जि. पालघर) यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान रविसिंग राजकुमार चितोडिया याने सांगितले की, मी अधुन मधुन बिबवेवाडी येथील पालावर झोपणेसाठी येत होतो. ०७/१२/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास एक महिला त्या पालामध्ये झोपलेली होती. तिला कोठून आल्याचे विचारता असता तीने गंगाखेड येथील राहणेची असल्याचे सांगीतले होते. ८/१२/२०२३ रोजी सकाळी मी कात्रज चौक येथील शराब देशी दारुचे दुकानात दारु पिणेसाठी गेलो असता तेथे विजय पाटील याच्या बरोबर ओळख झाली. आम्ही दोघे तेथे दारु पिलो. नंतर पुन्हा येवले वाडी येथे गेलो होतो. तेथे विजय पाटील तोल जावुन पडल्याने त्याचे डोक्यास मार लागल्याने तेथील मेडिकल मधुन बँन्डेज व सिप्लाडिन ही क्रिम घेवुन त्याचे डोक्यास पट्टी मारली. ०९/१२/२०२३ रोजी रात्रौ ०१/०० वाजता झोपणेसाठी बिबवेवाडी येथील पालावर आलो. त्या ठिकाणी महिला झोपलेली होती. रात्री ३ /०० वाजता आम्ही दोघांनी त्या महिलेला उठवले. त्या महिलेने आम्हाला शारीरीक संबध करणेस विरोध केल्याने व आमचे बरोबर झटापट केली. तेव्हा
माझे डावे हाताला महिलेचे नख लागले. त्यानंतर विजय पाटील याने त्या महिलेस पकडले व खाली पाडले. तेव्हा मी तेथे पडलेला हातोडा तिचे डोक्यात मारला. ती बेशुध्द पडली, त्यानंतर आम्ही तेथून गाडीवर बसुन येवले वाडी येथे गेलो व तेथे झोपलो. सकाळी उठल्यानंतर पुन्हा कात्रज येथील एस. पी. बार येथे दारु पिणेसाठी गेलो होतो. तेथे दारु पिण्यासाठी नंतर पैसे देणेसाठी नसल्याने बार मालक यांनी विजय पाटील याचा मोबाईल फोन ठेवून घेतला होता. त्यानंतर विजय पाटील याचे दाजी वैभव पाटील यांनी ९३० रुपये देवुन मोबाईल परत घेतला, असे सांगीतले.
विजय पाटील याचेकडे तपास करता त्याने दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने रविसिंग चित्तोडीया याचे मेळाचीच हकिगत सांगितली. रविसिंग चितोडिया याच्याकडे जप्त मोटर सायकल व त्याचेकडे मिळुन आले मोबाईल फोन बाबत तपास करता त्याने मोटर सायकल ही कामशेत येथुन चोरल्याचे व मोबाईल फोन कामशेत व नाशिक येथून हिसकावून चोरलेला असल्याचे सांगीतले. नमुद आरोपी गुन्हा करतेवेळी व पळुन जाण्याकरीता वापरलेली दुचाकी व मोबाईल असा ८०,००० रु. कि. ची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर खुनाच्या गंभीर गुन्हयाचा समांतर तपास करुन सदरचा गुन्हा हा जलद गतीने व मोठया कुशलतेने हाताळुन साधारण ५५ कि.मी. अंतरावरील २४०-२५० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन व बारकाईने तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हेगारांच्या वेळेत मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यातील अटक आरोपी रविसिंग चितोडिया याने खुनाच्या गुन्हयासोबत कामशेत पोलिस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ३७६/२०२३, भादंवि ३९२ ( मोटार वाहन व मोबाईल) इंदिरानगर पोलिस ठाणे, नाशिक शहर गुन्हा रजि. नं.३७०/२०२३, भादंवि कलम ३९२ (मोबाई जबरी चोरी) असे एकुण ०३ गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) व अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलिस उप निरीक्षक चैताली गपाट, पोलिस अमंलदार आश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे, अकबर शेख, दया शेगर, चेतन चव्हाण, शहाजी काळे, शशिकांत नाळे, अमित कांबळे, राहुल ढमढेरे, पांडुरंग कांबळे, विलास खंदारे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे व संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.

पुणे शहरात दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे शहरात अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन युनिट ५ने १० गुन्हे केले उघड…
पुणे शहरातील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना युनिट 5 कडून अटक…
पुणे शहरातील मोक्कामधील फरारी आरोपीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

