अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल…

घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील मानोली येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी अपराध क्रंमाक ५३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४, ७८ सह कलम ४, १२ अंतर्गत करण पांडुरंग सोनुले विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलिस उप निरीक्षक राजेश पंडीत करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानोली येथील एक अल्पवयीन मुलगी, आई व वडील यांच्या सोबत घाटंजी पोलिस स्टेशनला येवुन जबाणी रिपोर्ट दिला की, मानोली येथे कुटुंबासह राहते. तसेच मानोली येथील करण पाडुरंग सोनुले (वय २५) हा अँटो चालक असून त्याच्या अँटोमध्ये संबंधित अल्पवयीन मुलगी घाटंजी येथील शाळेत कधी कधी येत जात असते. त्यातुनच त्यांचे अंदाजे दोन महिन्या पासून ओळख होवुन प्रेम सबंध निर्माण झाले होते. २२ जानेवारी २०२५ रोजी १२/०० वा दरम्यान मुलीच्या घरी कुणीही नसताना करण सोनुले हा घरी गेला. अल्पवयीन मुलगी १७ वर्ष वयाची आहे हे त्याला माहित असतांना सुद्धा त्याने तिच्या इच्छे विरुद्ध शारीरीक सुखाची मागणी करुन तिचे सोबत जबरीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने ही घटना कुणालाही सांगीतल्यास तुला जिवाणे मारुन टाकतो, अशी धमकी दिली. त्यामुळे भितीने हि घटना मी आजपर्यंत कुणालाही सांगितली नव्हती. परंतु आता करण सोनुलेची हिम्मत वाढली आहे तो नेहेमी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन शारीरीक सुखाची मागमी करत आहे.

मुलगी त्याचे त्रासाला कंटाळून गेली असल्याने झालेली घटना आई व वडीलांना सांगितली. माझे आई वडिलांसोबत घाटंजी पोलिस स्टेशनला येवून जबाणी रिपोर्ट दिला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक राजेश पंडीत करीत आहेत.

पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार…

खासदाराने महिलेसोबत ठेवले सलग पाच वर्षे शारीरिक संबंध अन्…

आमदारांसह पोलिसांची कॅफेंवर धाड; विद्यार्थ्यांचे पडद्याआड सुरू होते अश्लील चाळे…

अल्पवयीन मुलीला बाजूच्या गल्लीत ये असे हाताने इशारा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल…

विद्येच्या माहेर घरात युवकासोबत तिघांनी केला विकृतीचा कळस…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!