सैराटची पुनारवृत्ती! आर्ची-परशासारखेच दोघांना संपवलं…
चेन्नई (तमिळनाडू): एका प्रेमीयुगलाने पळून जाऊन घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तमिळनाडूच्या थुथुकुडी येथील मुरुगेसन भागात ही घटना घडली आहे. भरदिवसा घरात घुसून एका जोडप्याची हत्या करण्यात आली. मुरुगेसने येथील मारी सेल्वम (वय २४) आणि थिरू व्ही नागा येथील रहिवासी कार्तिक (वय २०) हे गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंधात होते. 30 ऑक्टोबर रोजी दोघांनीही घरच्यांविरोधात पळून जाऊन लग्न केले आणि मुरुगेसन नगरमध्ये एकत्र राहू लागले.
गुरुवारी (ता. २) संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक पाच अज्ञात जण त्याच्या घरात शिरले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना घटनास्थळी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आरोपी दोन दुचाकीवरून आले होते. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…
युवतीचे इच्छेविरुद्ध लग्न अन् लग्नानंतर पुन्हा प्रेमसंबंध…
दोन भावांचा एकाच महिलेवर जडले प्रेम अन् पुढे…
महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…
चुलतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती चुलत्याला समजली अन्…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!