अविवाहीत गरोदर युवतीला घरच्यांनी जाळले जिवंत…

लखनौ (उत्तर प्रदेश): हापूड जिल्ह्यात एक अविवाहीत युवती गरोदर असल्याचे समजल्यानंतर तिच्याच घरच्यांनी तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत मुलगी ७० टक्के भाजली असून, गंभीर अवस्थेत तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हापूड जिल्ह्यातील बहादूरगड येथे ही घटना घडली आहे. एका २३ वर्षीय युवतीचे तिच्याच गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. घरच्यांनी मुलीची तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे कळाले. यानंतर घरच्यांना राग अनावर झाला होता. कुटुंबाने तिला जंगलात घेऊन जात जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. युवतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर गावकरी जंगलाच्या दिशेने धावत गेले तेव्हा हा प्रकार कळाला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेत युवतीची आई आणि तिचा भाऊ सहभागी आहे. या दोघांनी मुलीवर पेट्रोल टाकून तिला आग लावली. ज्यात ती ७० टक्के भाजली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताचे ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी युवतीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या युवतीवर उपचार सुरू आहेत. परंतु मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आई आणि भावाला अटक केली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक राजकुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नवादा खुर्द येथील एका युवतीला तिच्या कुटुंबाने जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना कळाली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले आणि पीडित मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवले. सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत. तिचा जबाब नोंदवला जाईल. पुढील तपास सुरू आहे.’

डॉक्टर, डॉक्टर खेळण्याच्या बहाण्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् गरोदर…

जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…

धक्कादायक! सरकारी अधिकाऱ्याकडून राहिली मित्राची मुलगी गरोदर…

सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिण राहिली गरोदर…

प्रियकराची वाट पाहून आलाच नाही; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!