नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलिस अकादमीत महिला पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्कार…
नाशिक : नाशिकमधील महाराष्ट्र पोलिस अकादमीत महिला पोलिस कर्मचाऱ्यावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीतल्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सुमित याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेली माहितीनुसार, पोलिस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीत कर्मचारी असलेल्या युवकासोबत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे प्रेमसंबंध होते. आरोपीकडून महिलेला शारीरिक संबंधासाठी विचारणा करण्यात आली. तिने नकार दिल्याने आरोपीने पोलिस महिलेला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. महाराष्ट्र पोलिस अकादमीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. तिथेच असा प्रकार घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या रहिवासी वसाहतीत हा प्रकार घडला आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीत रात्रभर सदर महिला पोलिस कर्मचाऱ्याला संशियत आरोपीने मारहाण केली. त्यानंतर संशयित आरोपीने बलात्कार केल्याची तक्रार महिलेने पोलिसात दाखल केली आहे. तक्रार देणारी महिला पोलिस कर्मचारी खाजगी रुग्णालयात असून तिच्यावर उपचार केले जात आहेत. बलात्कार आणि मारहाणीनंतर संशयित आरोपीने पीडित महिलेचे व्हिडिओ देखील काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
डॉक्टरने महिला डॉक्टरला नामांकित हॉटेलमध्ये नेऊन पाजली दारू अन्…
धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…
संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…
संतापजनक! मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी युवतीवर केला बलात्कार अन् पुढे…
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर प्रियकरासह सहा जणांकडून बलात्कार…