पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह अन् पत्नीने केली पतीची हत्या…

सोलापूर : सोलापूरमधील तांदूळवाडी येथे पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पतीच्या हत्येनंतर पत्नीने स्वत:च पोलिसांना कॉल करून खून केल्याचे सांगितले. धुळप्पा नंदकुमार हेले असे हत्या झालेल्या पतीचं नाव आहे.

धुळप्पा गेल्या १५ वर्षांपासून ट्रान्सपोर्टमध्ये वाहन चालक म्हणून काम करत होता. २०१२-१३ मध्ये त्याचे प्रगतीसोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांना सात आणि १२ वर्षांची मुली आहेत. पती पत्नीमध्ये झालेल्या वादातून पत्नी प्रगतीने धुळप्पा यांची हत्या केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पत्नीनेच पोलिसांना १०० नंबरवर कॉल केला आणि खून केल्याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. धुळप्पा यांना रुग्णालयात नेले पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, धुळप्पा यांची आई नातेवाईकांच्या लग्नाला गेली होती. त्यानंतर पती पत्नीमध्ये सकाळपासूनच वाद सुरू होते. प्रगतीच्या माहेरचे लोकही घरी आले होते. धुळप्पा यांच्या डोक्यात लाकडाने वार करण्यात आले. त्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात पतसंस्थेच्या अध्यक्षा महिलेची चाकूने वार करून हत्या…

कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन…

मुळशी हळहळली! विवाहापूर्वी पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू…

पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…

Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!