
महागांव केरोसीन घोटाळा प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता…
यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यात सन 2005 साली गाजलेल्या महागांव केरोसीन घोटाळा प्रकरणातील 35 आरोपींची महागांव येथील दिवाणी न्यायाधिश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी संतोष एच. आगे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष म्हणजे सदरचा खटला 17 वर्षे चालला असून सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला होता, हे येथे उल्लेखनीय.
सदर प्रकरणात शासनाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. एस. बी. नरवाडे यांनी मांडली. तर आरोपी तर्फे ॲड. व्ही. बी. देशमुख, झेड. ओ. भंडारी यांनी काम पाहिले. यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील रेशन कार्ड धारकांची लोकसंख्या वाढवून अतिरिक्त केरोसीन काळया बाजारात विकण्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी सन 2005 मध्ये केरोसीन घोटाळ्याची तक्रार करण्यात आली होती. जुन्या शासन निर्णयाचा आधार घेऊन या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी याचीका दाखल करण्यात आली. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महागांव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यात यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी गोविंदराव कुबडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भागवत सैंदाने, महागांव तालुक्यातील 4 अर्ध घाऊक केरोसीन विक्रेते व 32 किरकोळ विक्रेते साहेबराव कांबळे, अरुण ढोबळे, भगवान नरवाडे, कमरुद्दिन गाजीयानी, अनंत उर्फ आनंद काळबांडे, नारायण पवार, अब्दुल रब अब्दुल समद उर्फ आर. एस. शेख, भगवान भावनकर, देविदास पोदूतवार, उत्तमराव नरवाडे, मो. हारुण शेख मोहीद्दीन, जयश्री जाधव, मो. असलम अब्दुल रज्जाक, सिंधु भगत, जयराम रावते, नारायण तांडे, फकीरराव चावरे, आनंदराव पूंड, चंद्रकाल धोंडगे, विष्णूकांत पेंशनवार, विजय कृष्णापूरे, विजय अयुब शेख हम्जा, वसंतराव महाजन, नितीन येरावार, रमेश गुलफुलवार, प्रतापराव देशमुख, नारायण अमीलकांथीवार, गुलाबराव उबाळे, शंकर जाधव, मंजू पवार, विजय बंकेनवार, विजय बोंपीलवार आदीं विरुद्ध महागांव पोलिस ठाण्यात भादंवि कलम 420, 467, 468, 471, 472, 201, 34 व जीवनावश्यक वस्तू कायदा 3, 7 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले होते.
तदनंतर महागांव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर प्रकरणात सरकारी पक्षाचे साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यासाठी अपयशी ठरल्याने सदर प्रकरणातील सर्वच आरोपींची दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी संतोष एच. आगे यांनी निर्दोष मुक्तता केली.
आरोपींची बाजू ॲड. विवेक देशमुख, ॲड. आशिष देशमुख, ॲड. इम्रान देशमुख (यवतमाळ), ॲड. जावेद वर्षाणी, ॲड. जिवन नर्सिंग, ॲड. सुनिल नरवाडे व ॲड. गौतम कांबळे आदींनी बाजू मांडली. सदर प्रकरणात पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल होणार असल्याचे समजते.
यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी…
यवतमाळ येथील खुनाच्या खटल्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता…
यवतमाळ जिल्ह्यातील PI, API पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणूका…
यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…
यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

