
निलगाय शिकार प्रकरणी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात शनिवारी रात्री परिमंडळ माथणी येथील वनपाल शशांक सोनटक्के तसेच बोथ येथील वनरक्षक दिगांबर पोटे व वनरक्षक अनिकेत चव्हाण (भाडउमरी) हे रात्रगस्त करत होते. रात्री 10.30 वाजताच्या सुमारास वन्यजीव विभागातील सावंगी (संगम) बीट कक्ष क्रमांक 127 च्या जवळील प्रादेशिक विभागाच्या शेत शिवारात बॅटरीचे लाईट तसेच मोटरसायकलचे लाईट वन कर्मचारी यांना दिसले असता सबंधित वन कर्मचारी हे शेती क्षेत्राकडे निघाले असता, कोणीतरी आपल्याकडे येत आहे हे पाहून आरोपींनी पळायला सुरुवात केली.
वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपींचा पाठलाग केला असता आरोपी हे मोटरसायकल सोडून पळून गेले. लगेच वन कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून शेत गट क्रमांक 129 मौजा सावरगांव येथे पोहोचले तेंव्हा तेथे नीलगाय वन्य प्राण्यांचे मोठ मोठे तुकडे केलेले काही मांसाचे तुकडे साडीच्या कापडामध्ये गुंडाळलेले आढळून आले. यावेळी आरोपी कडून निलगाय चे मांस 80 किलो, दुचाकी मोटार सायकल 6 व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घटनास्थळी आरोपी नारायण नामदेव गाउत्रे (वय 50, रा. सावरगांव ता. घाटंजी) व आरोपी सुभाष अमृत भंडारे (वय 53, रा. सावरगांव ता. घाटंजी) यांना निलगायचे मांस साडीच्या कपड्यात गुंडाळून प्लास्टिकच्या बोरीत नेत असतांना वन कर्मचारी यांनी पाठलाग करून पकडले. सदर गट क्रमांक 129 मध्ये वन कर्मचारी आदींनी शेती परिसराची छाननी केली असता शेत विहिरीजवळ निलगायचे मांस, निलगायचे शीर तसेच ताराचा गुंडाळा इत्यादी मुद्देमाल आढळून आला. तसेच एकूण 6 दुचाकी मोटार सायकल जप्त करण्यात आल्या.
फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’
आरोपी नारायण गाऊत्रे व सुभाष भेंडारे विरुद्ध माथणी येथील वनपाल एस. जे. सोनटक्के यांनी वन्यजीव निलगाय (रोही) प्राणी (भारतीय वन्यजीव संरक्षण) अधिनियम 1972 सुधारित 2002 नुसार प्राणी पकडणे व विद्युत करंट लाऊन शिकार करणे या आरोपाखाली भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 (सुधारित) 2002 चे कलम 9 अंतर्गत वन गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर कार्यवाही पांढरकवडा येथील वनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी (क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती), विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र कोंडावार, वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत सोनुले, वनपाल शशांक सोनटक्के, वनरक्षक दिगंबर पोटे व वनरक्षक अनिकेत चव्हाण आदींनी पार पाडली.
घाटंजी तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याच्या सिमेवरील शेती भागात शिकारी सदृश्य हालचाली आढळून आल्यास शेतकरी व नागरीक यांनी तात्काळ वन्यजीव विभागास माहिती द्यावी, माहिती देणाऱ्यांचे नाव व ओळख गुप्त ठेवण्यात येईल. या प्रकरणी सर्वांनी वन्यजीव विभागास सहकार्य करण्याचे आवाहन, पांढरकवडा येथील विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांनी केले आहे.
बीड पोलिस अधीक्षकांच्या घरात धक्कादायक प्रकार, पोलिस कर्मचारी निलंबित…
मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…
माजी नगरसेवक तोंडाला रुमाल बांधून घुसला महिलेच्या घरात; बेदम मारलं…
पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
हृदयद्रावक! मुलगी IAS झाल्याचे पेढे वाटताना वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू…

