
गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…
पुणे: कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पुणे पोलिसांनी धाड टाकून संपूर्ण घराची झडती घेतली. या झाडाझडतीमध्ये पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत.
पोलिसांना निलेश घायवळ याच्या घरी मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीची कागदपत्रं, पासबुक आणि इतर साहित्य मिळाले आहे. जमिनींचे हे व्यवहार मराठवाड्यातील पवनचक्यांच्या जवळपासचे आहेत. त्याचबरोबर घायवळच्या घरातून पोलिसांना अनेक जिवंत काडतूसं सापडली आहेत. त्यामुळे पोलिसांनी घायवळवर आणखी एक गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी घायवळच्या घरातून एकूण 40 कागदपत्रे जप्त केली आहेत.
गुंड निलेश घायवळ याने पुणे शहराबरोबरच नगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारीचे जाळे पसरवले होते. या भागातील पवनचक्की कंपन्यांच्या मालकांना धमकावून निलेश घायवळ याने भरपूर पैसे कमावले होते. त्यासाठी या भागातील राजकीय नेत्यांचं त्याला पाठबळ मिळाल्याचे सांगितले जाते. त्याची परतफेड घायवळ या नेत्यांना त्यांच्या राजकारणात मदत करून करायचा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पुणे शहरातील कोथरूड परिसरात घायवळ टोळीच्या गुंडांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. शिवाय, एका व्यक्तीवर कोयत्याने वार केला होता. यानंतर पोलिसांनी घायवळ गँगच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली होती. पुणे पोलिसांनी लगेच निलेश घायवळचा शोध सुरु केला होता. परंतु, तो लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली होती. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असतानाही निलेश घायवळ याला पासपोर्ट कसा मिळाला आणि पोलिसांनी त्यासाठी घायवळला चारित्र्य प्रमाणपत्र कसे दिले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. दरम्यान, निलेश घायवळ याचे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंध असल्याचा अप्रत्यक्ष आरोप शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.
गॅंगस्टर निलेश घायवळ याचा आणखी एक कारनामा समोर…
गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….
कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे तर…
गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आली समोर…
पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…
पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं…
पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…

