Video: मोबाईल चोराला मिळाले पत्नीचे प्रायव्हेट व्हिडीओ अन् पुढे…

मुंबई : एका 25 वर्षीय डिलिव्हरी बॉयचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने सुमारे महिनाभरापूर्वी चोरला होता. चोराला मोबाईलमध्ये महिलेचे खाजगी व्हिडीओ सापडल्यानंतर चोराने ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि लाखो रुपयांची मागणी केली. या प्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईलच्या मालकासोबत चोरट्याने संपर्क साधला आणि म्हणाला, एक लाख रुपये दिले न दिल्यास मोबाईलमधील पत्नीचा खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करेल अशी धमकी दिली होती.

एक युवक डिलिव्हरीचे काम करत असताना 3 जुलै रोजी एका दुचाकीस्वाराने त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. त्याची तक्रार त्याने आंबोली पोलिस ठाण्यात दिली होती. तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की, ’26 जुलै रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास त्याला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यामध्ये अहमद खान असे नाव त्याने सांगितले. मोबाईलच्या मेमरी कार्डमध्ये त्याला काही प्रायव्हेट व्हिडीओ सापडले. त्यामध्ये त्याच्या पत्नीचेही प्रायव्हेट व्हिडीओ असल्याचे त्याने सांगितले. आरोपीने एक लाख रुपयांची मागणी केली आणि असे न केल्यास तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू अशी धमकी दिली.

आरोपीचे अनेक कॉल येत होते. 30 जुलै रोजी आरोपीने संपर्क साधला आणि सांताक्रूझ येथील रेट्रो रेस्टॉरंटमध्ये भेटण्यास बोलावले. दोघे एकमेकांना भेटल्यानंतर आरोपीने मोबाईलमधील पत्नीचा खाजगी व्हिडिओ दाखवला. शिवाय, हा व्हिडीओ त्याने एका मित्रालाही फॉरवर्ड केल्याचे त्याने सांगितले. संबंधित व्हिडीओ हवा असेल तर एक लाख रुपये दे अशी मागणी आरोपीने फिर्यादीकडे केली. तसे न केल्यास तो व्हिडीओ दोन लाख रुपयांना विकण्याची धमकी दिली.

दरम्यान, संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होईल, अशी भीती फिर्यादीला होती. त्यामुळे त्याने आरोपीकडे पैसे जमा करण्यासाठी 10 दिवसांचा वेळ मागितला आणि आरोपीनेही तसा वेळ दिला. पण त्यामुळे एवढी रक्कम जमा करणे अवघड असल्याने पोलिसांकडे तक्रार केली. वनराई पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि अंधेरीतील ओशिवरा येथून एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्…

महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्…

Video Call वर महिलेशी मैत्री; रोमॅन्टिक गोष्टी अन् पुढे…

ऑनर किलिंग! वडील मलाही संपवतील; विद्याचा मन सुन्न करणारा आर्त टाहो…

यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!