
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय अन् एक दिवस…
मुंबई : कुर्ला येथे मीठी नदीच्या किनाऱ्यावर 5 जानेवारी रोजी एका युवकाचा मृतदेह सापडला होता. क्राइम ब्रँचच्या युनिट 5ने या प्रकरणाचा छडा लावला आहे. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून युवकाची हत्या झाल्याची घटना तपासादरम्यान समोर आली आहे.
कुर्ला येथील मीठी नदीच्या किनाऱ्यावर 5 जानेवारी रोजी अमान अब्दुल शेख (वय २३) या व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो रिक्षा चालवत होता. रिक्षाचा मालक नफीस खान याने प्रतिदिन 300 रुपयांच्या भाड्याने अमान याला रिक्षा चालवायला दिली होती. नफीसने एकूण 6 रिक्षा भाड्याने दिल्या होत्या. अमानचे नफीसच्या घरी येणे-जाणे होते. अमान आणि नफीसची बायको यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय नफीसला होता. नफीस याने पत्नीसोबत भांडण केल्यामुळे ती माहेरी निघून गेली होती.
याच रागातून नफीस याने ताकिब आणि मुकेश या दोन साथीदारांच्या साह्याने अमानच्या हत्येचा कट रचला. अमान पैसे देण्यासाठी 5 जानेवारीला गोवंडीतल्या घरी आला, तेव्हा तिघांनी त्याचा गळा दाबला आणि त्याचा मृतदेह त्याच्याच रिक्षात ठेवून मीठी नदीजवळ ती रिक्षा घेऊन गेले. मृतदेह त्यांनी नदीत फेकला होता.
अमान बहिणीसोबत गोवंडीला राहायचा. नफीसही त्याच्या बहिणीला ओळखत होता. तिने भाऊ हरवल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. मीठी नदीत मृतदेह सापडल्यावर कुर्ला क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक घनःश्याम नायर यांनी मुंबईच्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली. तेव्हा तो अमानचा मृतदेह असल्याची खात्री पटली. नफीस खान अमानच्या बहिणीकडे गेला असल्याचे अमानच्या बहिणीकडून पोलिसांना समजले. अमान रिक्षा घेऊन कुठे गेलाय याची चौकशी नफीसने केली होती. पोलिसांना नफीस खानच्या बोलण्याबाबत संशय आला. त्यांनी 5 तारखेचे लोकेशन तपासले तेव्हा गोवंडी ते मीठी नदीपर्यंतचं लोकेशन त्यांना मिळाले.
दरम्यान, पोलिसांनी त्या रस्त्यावरचं सीसीटीव्ही फूटेजही तपासले. त्यात नफीस, त्याचे सहकारी एका मृतदेहासोबत रिक्षात असलेले दिसले. त्यावरून तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्यांनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपी नफीस खान व त्याच्या 2 सहकाऱ्यांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…
वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…
पत्नीचे अनैतिक संबंध अन् कुटुंबातील चौघांचे मृतदेह…
पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…
सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस…

