हृदयद्रावक! कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली अन् लेकराचा बळी…
औरंगाबाद : खासगी बँकेत कर्ज वसुलीचे काम करणाऱ्या एकाने अवैधरित्या गावठी कट्टा विकत घेतला. पण विकत घेतलेला कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली आणि त्याच्याच अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. आर्यन राहुल राठोड (वय 2), असे मृत चिमुकल्याचे नाव असून, राहुल कल्याण राठोड (वय 29) असे त्याच्या वडिलांचे नाव आहे.
औरंगाबादच्या गंगापूर शहरातील अहिल्यादेवीनगर येथे राहुल कल्याण राठोड हा कुटुंबियासह राहात आहे. राहुल हा कर्ज वितरण करणाऱ्या एका बँकेत वसुलीचे काम करतो. आपल्या कामात वसुलीचे करण्याची गरज पडते म्हणून त्याने एक गावठी कट्टा विकत घेतला. 25 ऑगस्ट रोजी तो गावठी कट्टा आपल्या घरी घेऊन आला. पण हा गावठी कट्टा नेमका चालवायचा कसा? याबाबत राहुलला कोणतीही माहिती नव्हती. घरी आल्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास आपण आणलेला गावठी कट्टा तो आपल्या पत्नीला दाखवत होता. पण याचवेळी कट्ट्यातून गोळी सुटली आणि त्यांच्याच अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसली. घरात झालेल्या गोळीबारात मुलगा आर्यन राठोड गंभीर जखमी झाला होता.
आर्यनच्या कपाळात मधोमध गोळी लागली होती. तेव्हापासून तो अत्यवस्थ होता. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी (ता. 25 ऑगस्ट) रात्री त्याची शस्त्रक्रिया केली होती. तेव्हापासून तो घाटीतील अतिदक्षता विभागात होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली होती. तसेच राहुलला ताब्यात घेऊन अटक केली. दरम्यान, आर्यनच्या मृत्यूची बातमी डॉक्टरांनी देतात संगीता यांनी घाटी रुग्णालयात टाहो फोडला. हे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. याशिवाय मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच परिसर हळहळून गेला होता.
औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…
माता न तू वैरिणी! मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल…
भावकीमध्ये असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने घेतला मोठा निर्णय…
धक्कादायक! भाऊजीची अन् मेहुण्याची एकाच दिवशी आत्महत्या…
धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…