पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वत:वरच झाडून घेतली गोळी…

लातूर : कर्तव्यावर असलेल्या पोलिसकाकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पांडुरंग पितळे असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. लातूर येथील विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात ते कार्यरत आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग पितळे यांनी कर्तव्यावर असताना डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. पांडुरंग पितळे हे लातूर येथील विवेकानंद पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांची ड्युटी गांधी चौकामध्ये लावण्यात आली होती. याचदरम्यान ही घटना घडली आहे.

एका पोलिस कर्मचाऱ्यानं डोक्यात गोळी घालून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांनी गोळी का झाडली? याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. पण, या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसकाकाचे लग्नाचे वय आणि चांगल्या स्थळाच्या सुट्टीचा अर्ज व्हायरल…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…

पोलिसकाकांनी आजीला काही मदत हवी आहे का? असे विचारले अन्…

पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!