घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य फरार आरोपी भिंडे याला अटक…

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी आरोपी भावेश भिंडे याला अखेर मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या जयपूरमधून अटक केली आहे. वादळी वाऱ्यानंतर घडलेल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. बेकायदेशीरपणे बॅनर उभारुन 17 जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भावेश भिंडे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

घाटकोपर दुर्घटनेनंतर आरोपी भावेश भिंडे बेपत्ता झाला होता. भावेश भिंडेच्या मागावर मुंबई पोलिसांची 7 पथकं कार्यरत होती, वेगवेगळ्या भागात भिंडेचा पोलिसांकडून शोध सुरु होता, तो राज्याबाहेर पळाल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार, पोलिसांनी शोधमोहिम राबवली होती. पोलिसांनी भिंडेला राजस्थानमधून अटक केली आहे.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

राजधानी मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या भीतीने भिंडे याने पळ काढला होता, पण अखेर मुंबई पोलिसांचे पथक भिंडेच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी ठरले आहे. पोलिस पथक मागावर असल्याचे समजताच, पोलिसांचे पथक लोणावळ्यात पोहचण्यापूर्वीच भावशने आपला मोबाईल बंद केला, त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. मात्र, पोलिसांनी त्याला जयपूरमधून अटक केली आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा जीव गेला असून 75 जण जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून सुरू असलेलं येथील बचावकार्य अखेर 63 तासांनी संपल्याचं जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी मुंबईत जो सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला त्यात, आशियातील सर्वात मोठ होर्डिंग अशी नोंद असलेले घाटकोपर पूर्व द्रुतगती महामर्गावरील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर 75 जण जखमी झाले होते. जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. इगो मीडियाकडे या होर्डिंगचं कंत्राट होते. होर्डिंग लावलेली जागा रेल्वे पोलिसांची होती. बेकायदा आणि महाकाय होर्डिंग लावायला रेल्वे पोलिसांनीच परवानगी दिली होती.

घाटकोपर होर्डिंग दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार…

मुंबई पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर; कारण…

सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या…

सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख एक धाडसी अधिकारी…

विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!