
पुणे! नवले पुलावर ट्रकची वाहनांना जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू…
पुणे : पुणे शहरातून जात असलेल्या नवले पुलावर अवघ्या १० तासांत दुसऱ्यांदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका ट्रकने दोन ते तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, इतर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोरून जाणाऱ्या वाहनांवर ट्रक आदळला. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, इतर वाहन चालक व प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातात तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले असून, काही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, नवले पुलावर काही तासांपूर्वी आणखी एक अपघात झाला होता. त्या अपघातातही एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अवघ्या ८-१० तासांत दोन अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला आहे.
View this post on Instagram
पुणे शहरातील नवले पुलाजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; पाहा जखमींची नावे…
पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात…
Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…
पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू…
नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…

