ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनचं उत्तर; मी पुन्हा लग्न करतोय…

मुंबईः अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. पण, दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगण्याची ही पहिली वेळ नव्हती, यापूर्वीही दोघांच्या घटस्फोटाबाबत चर्चा रंगलेल्या आणि त्यावेळी अभिषेक बच्चन याने सडेतोड उत्तर देऊन सर्वांची बोलती बंद केली होती.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा 2007 मध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. तेव्हापासून अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन इंडस्ट्रीतील फेवरेट कपल्सपैकी एक झाले. दोघांच्याही वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्याच्या अनेक अफवा पसरल्या. जोडपं घटस्फोटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण, अभिषेक-ऐश्वर्या याकडे दुर्लक्ष केले.

अभिषेक बच्चन याने 2016 मध्ये ट्विटरवर स्पष्टीकरण दिले. आपल्या खास कॉमिक टायमिंगसोब अभिषेकनं सर्व अफवा फेटाळून लावल्या. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं की, “ठीक आहे… तर मला वाटतंय की, मी घटस्फोट घेतोय. मला सांगितल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही मला सांगाल का की, मी दुसरं लग्न कधी करतोय? धन्यवाद। #मपेट्स।”

ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेकने कॉमिक अंदाजात उत्तर दिलं, पण बोचणारे शब्द वापरलेले. घटस्फोटाच्या चर्चांवर सेंस ऑफ ह्यूमरचा वापर करुन उत्तर दिल्याबद्दल चाहत्यांनी अभिषेकचे कौतुक केले. शिवाय, एका मुलाखतीदरम्यान घटस्फोटांच्या अफवांवर सडेतोड उत्तर दिले. तो म्हणाला की, यापूर्वीही भूतकाळात मी आमच्याबाबत खोट्या कहाण्या ऐकल्यात. पण, आता त्याचं कुटुंब आहे, त्यामुळे यासर्व गोष्टींचा कुटुंबावर वेगळा प्रभाव पडतो. अभिषेक म्हणाला की, “हे खूपच हैराण करणारं आहे. तुम्ही म्हणजे मी नाही, तुम्ही माझं आयुष्य जगत नाही…”

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या कारला अपघात…

अभिनेत्रीच्या एकुलत्या एका मुलाने 57व्या मजल्यावरून मारली उडी…

संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली…

अभिनेता तुषार घाडीगावकार याने काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल…

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!