ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या; नदीवर अंघोळ केली अन्…
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याची पतीने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या सगळ्या प्रकारानंतर गडचिरोलीत खळबळ उडाली आहे.
गडचिरोलीच्या कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद (वय 30) यांची त्यांचा पती ताहेमिम शेख (वय 38) याने चाकूने भोसकून हत्या केली. गुरुवारी (ता. १४) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास दोन मुलांच्या समोर ताहेमिमने चाकूने भोसकून पत्नीची हत्या केली. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास राहत यांचे वडील नजद गुलाब सैय्यद झोपेतून उठल्यानंतर त्यांना राहत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. नजद गुलाब सैय्यद हे कुरखेडा येथील निष्ठावान शिवसैनिक असून राहत ही त्यांची मुलगी होती.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती ताहेमिम शेख याने नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. तेथून त्याने सरळ पोलीस ठाणे गाठून पोलिसांना जाऊन हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनीच तत्काळ ताहेमिम याला अटक केली. आरोपी ताहेमिम शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात अटक झाली होती. 15 दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून घरी आला होता. लग्नाआधी तो मुंबईत फुटपाथवर साहित्य विक्रीचे काम करायचा. लग्नानंतर ताहेमिम आणि राहत हे दाम्पत्य नजद गुलाब सैय्यद यांच्या घरी मजल्यावर राहात होते.
दरम्यान, कोणत्या कारणामुळे राहतची हत्या झाली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास करत आहेत.
भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…
…अखेर भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचं गुढ उलगडलं
पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…
डॉक्टर, डॉक्टर खेळण्याच्या बहाण्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् गरोदर…
धक्कादायक! संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीची केली हत्या अन् पुढे…