तुळजापूरला देवीची ज्योत आणायला गेलेल्या तीन युवकांचा अपघाती मृत्यू…

तुळजापूर: तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन आपल्या गावाकडे परतणाऱ्या युवकांवर काळाने घाला घातला आहे. बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास कंटेनरने युवकांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये तीन युवकांचा मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव आणि जाफ्राबादवाडी येथील काही तरुण श्रीक्षेत्र तुळजापूर येथून आई तुळजाभवानीची ज्योत आणायला गेले होते. तुळजापुरात त्यांनी देवीचं दर्शन घेतलं आणि ज्योत घेऊन आपल्या गावाकडे निघाले. यावेळी काही युवक ज्योत घेऊन धावत होते. तर तेल पुरवठा करणारे दोघे जण दुचाकीवरून (एमएच २० सीएस ००७४) सोबत चालले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी परिसरात मागून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कंटेनरने दुचाकीला तब्बल ५ किलोमीटरपर्यंत रस्त्यावरून घासत नेले. या अपघातात जाफ्राबादवाडी येथील रहिवासी असलेला आणि काटशेरी फाटा येथे गॅरेज चालवणारा अक्षय राजपूत याचा जागीच मृत्यू झाला. तर गोळेगाव येथील अमोल औटे व गोरख म्हस्कर या दोघांचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेत शुभम आधाने हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातानंतर कंटेनरचालकाने घटनास्थळावरून वाहनसह पळ काढला आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. नवरात्रोत्सवाच्या पवित्र काळात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिकच्या दीपाली पवार मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट…

कोल्हापूरमध्ये प्रेमाचा भयानक शेवट; तू माझी नाही तर कोणाचीच नाही…

नवविवाहित युवक आणि युवतीच्या पायाला साखळी अन् कुलुप; नदीत दोघांचे मृतदेह…

पुणे MPSC आंदोलनाबाबत दुसरा गुन्हा दाखल; पाहा नावे…

धक्कादायक! इंजिनिअर नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात घातला दगड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!