
नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू…
नाशिक: सराईत गुन्हेगारांसह अमली पदार्थ बाळगणाऱ्यांच्या संपर्कात असल्याने सात महिन्यांपूर्वी नाशिक शहर पोलिस दलातून बडतर्फ केलेल्या तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. इरफान मन्सूर शेख (वय ३५, रा. वडाळागाव) असे मृताचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
इरफानने आत्महत्या केली, की नशेच्या ‘ओव्हर डोस’ मुळे त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला यासंदर्भातील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे. भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत असलेल्या एका लॉजमधील खोलीत शनिवारी (ता. ३१) रात्री उशिरा इरफानचा मृतदेह आढळला. रविवारी (दि. १) सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. त्यावेळी इरफानच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसल्याने ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी उशिरा तो परराज्यातून नाशिकमध्ये परतला होता. भद्रकाली हद्दीत एका लॉजमध्ये मुक्कामासाठी गेल्यावर हा प्रकार घडला.

‘ओव्हर डोस’ मुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भद्रकाली पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद असून, तपास सुरू आहे. इरफान याच्या मागे वडील, पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. त्याचे वडील नाशिक पोलिस दलातून निवृत्त झालेले असून, त्याचे सख्खे व चुलतभाऊ शहर पोलिस दलात कार्यरत आहेत.
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!
अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!
गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

