संतापजनक! बापाने चिमुकलीच्या तोंडात तंबाखू देऊन केली हत्या…

जळगाव : तीन मुलींच्या पाठीवर तिसरीही मुलगीच झाल्यामुळे संतप्त झालेल्या जन्मदात्या बापाने आपल्या आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केल्याची धक्कदायक घटना जामनेर तालुक्यातील वाकोदजवळ हरिनगर तांडा येथे उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गोकुळ गोटीराम जाधव (वय ३०) असे या आरोपी बापाचे नाव आहे.

मुलीची हत्या केल्यानंतर बापाने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर संशयित बापाला पोलिसांनी अटक केली आहे. गोकुळ जाधव याला पहिल्या दोन मुली आहेत. शनिवार (ता. २) वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरे अपत्य मुलगी जन्माला आली. गोकुळने रविवारी चिमुरडीच्या तोंडात तंबाखू दिली. तिला झोळीत झोपविले, यात तिचा मृत्यू झाला. रात्री फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आरोग्य पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर 10 दिवसापर्यंत चिमुरडीच्या बापाने या घटनेची कुणालाही माहिती मिळू दिली नाही. आशा सेविका जन्माची नोंद घेण्यासाठी घरी गेल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी घटनेची तातडीने गंभीर दखल घेत गोकुळ जाधव याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आधीच दोन मुली व त्यात तिसरीही मुलगी झाल्याच्या रागातून त्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिचा जीव घेतल्याची कबुली दिली.

घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत संशयित बापाला अटक केली आहे. फॉरेन्सिक पथकाच्या माध्यमातून घटनास्थळी भेट देण्यात आली आहे, तसेच ज्या ठिकाणी बापाने चिमुरडीचा मृतदेहाची विल्हेवाट लावली होती, त्याठिकाणाहून मृतदेह हा ताब्यात घेण्यात आला आहे, पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली आहे.

जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…

माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…

हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…

धक्कादायक! पोलिस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा चाकूने भोसकून केला खून…

धक्कादायक Video! चिमुकलीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर झाडल्या गोळ्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!