क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे.
पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत. प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा….
क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील हे पोलिस दलात तब्बल ३१ वर्षांपासून कार्यरत आहेत. जन्म त्यांचा कोल्हापूरमधील. रांगडा पोलिस अधिकारी. पिळदार शरीरयष्टी आणि दमदार आवाज. श्री. पाटील यांना पाहताक्षणी आरोपी गार पडतात आणि गुन्हा कबूल करू लागतात. पण, वर्दीमध्येसुद्धा एक हळवा अधिकारी दडला आहे, याचासुद्धा अनुभव येतो. पोलिस दलात काम करत असताना त्यांनी गोरगरिबांना प्रंचड मदत केली असून, त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. क्रांतीकुमार पाटील या अधिकाऱ्याविषयी थोडक्यात…
क्रांतीकुमार पाटील म्हणजे प्रचंड उर्जा असलेला अधिकारी. चेहऱ्यावर तेज. कोल्हापूरच्या मातीमधील जन्म असल्याचे त्यांच्याकडे पाहताक्षणी जाणवते. आरोग्याकडे पहिल्यापासूनच लक्ष. शालेय जिवनामध्येच मैदानी खेळाची आवड निर्माण झालेली. मैदानावर घाम गाळून कमावलेले शरीर वयाच्या ५३व्या वर्षीही जपले आहे. शाळेतही पहिल्यापासूनच हुषार. पहिला दुसरा नंबर तर कधी सोडलाच नाही. एमपीएससी परीक्षेतही अगदी दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळवले. एमपीएससीच्या शारीरिक चाचणीमध्ये २०० पैकी २०० गुण मिळविणारा अधिकारी आहे. यावरून त्यांची हुषारी आणि आरोग्याकडे किती लक्ष आहे हे दिसून येते.
क्रांतीकुमार पाटील यांना वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच कबड्डी खेळाची आवड निर्माण झाली. शालेय जिवनामध्ये असताना बहुतांश वेळ त्यांचा मैदानावरच जाऊ लागला. कोल्हापूरच्या लालमातीमध्ये लहान वयातच पीळदार शरीर कमावले. घरामध्ये पौष्टीक आहार मिळू लागला. शिवाय, कबड्डीमध्ये लागलेली गोडी यामुळे ते शालेय जिवनात चमकले. शाळेत असतानाच कबड्डी खेळामध्ये मजल मारत ते राज्यस्तरावर जाऊन पोहोचले होते. अनेक पुरस्कारही मिळवले.
कोल्हापूर जिल्ह्यातील एका खेड्यातील जन्म. वडील गावचे सरपंच. मोठे घर, यामुळे घरी सतत वर्दळ. नागरिकांचे घरी काही कामानिमित्त जाणे-येणे असायचे. वडील अनेकांचे प्रश्न सोडवायचे. हे लहानपणापासून त्यांना पाहायला मिळाले. शिवाय, घरासमोर विविध निवडणूकांचे मतदान पार पडायचे. मतदानादरम्यान पोलिस अधिकारी, कर्मचारी येत असत. पोलिस अधिकाऱ्यांना वडील चहा, पाणी, पोहे द्यायला पाठवायचे…
सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
‘पोलिसकाका विशेषांक’
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616
अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com