
पुणे शहरातील मोक्कामधील फरारी आरोपीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): मोक्का केस मध्ये फरार असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात गुन्हे शाखा, युनिट-०५ ला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील मोक्का, खुन, खुनाचा प्रयत्न या गुन्हयातील पाहिजे व फरार आरोपींना अटक करणेसाठी आदेशित केलेले होते. प्राप्त आदेशाप्रमाणे युनिट-५ कडील प्रभारी पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी व वरिष्ठांचे आदेशान्वये कार्यवाही करणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. १४/०९/२०२३ रोजी युनिट ५, गुन्हे शाखेकडील पोउपनि. लोहोटे व तपास टिम युनिट कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, पोलिस अंमलदार, राजस शेख व पृथ्वीराज पांडुळे यांना त्यांचे बातमीदारां मार्फतीने बातमी मिळाली की, कोंढवा पोलिस ठाणेकडील मकोका सारख्या गुन्हयातील आरोपी साहिल कचरावत हा महमंदवाडी वनीकरण जंगलात, तरवडेवस्ती, कोंढवा येथे लपून बसलेला आहे.
पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, युनिट -०५, गुन्हे शाखा,पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली युनिटकडील पथक हे वाहनाने बातमीच्या ठिकाणी वनीकरण जंगलात जाऊन शोध घेतला असता, स्टाफ ओळखत असलेला व पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल कचरावत हा एका झाडाच्या बुंध्या जवळ बसलेला दिसला. त्यावेळी पोलिसांची नजरानजर होताच तो उठुन पळू लागला तेव्हा पोलिसांनी साहिल अर्जुन कचरावत (वय-२२ वर्षे,रा.स.नं.६८, सातवनगर, होंडवाडी रोड, कंजारभट वस्ती, हडपसर, पुणे) याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. तो कोंढवा पोलिस ठाणे, गुन्हा रजि. नं.८०२/२०२२, भा.दं.वि. कलम ३८६,५०४,५०६(२),आर्म अॅक्ट ४ (२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३), १३५,१४२,महाराष्ट्र क्रिमीनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ७, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम सन १९९९चे कलम ३ (१) (1),३(२),३(३),३(४) या गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याने त्याची वैद्यकिय तपासणी करुन सहायक पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे यांच्या ताब्यात दिला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त, अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त, सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, स.पो.नि. कृष्णा बाबर, पो.उप.नि. अविनाश लोहोटे, चैताली गपाट, पोलिस अंमलदार, राजस शेख, प्रमोद टिळेकर, दया शेगर, पृथ्वीराज पांडुळे, दाऊद सय्यद, विनोद शिवले, अकबर शेख, विलास खंदारे यांनी केली आहे.
पुणे शहरात खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या वृध्द महिलेची केली सुटका…
पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…
पुणे-नगर महामार्गावरून गुन्हे शाखा युनिट ६ ने दोघांना ताब्यात घेतले अन्…
पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…