जालन्यात भीषण अपघात! चिमुकलीसह तिघांचा मृत्यू; चालक फरार…
जालना : शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह, सहा वर्षीय मुलगी आणि एका ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चार वर्षीय चिमुकली जखमी झाली आहे. मंठा येथील देवी रोडवर ही घटना घडली आहे. अपघातानंतर आयशर चालक फरार झाला आहे.
मंठा शहरातील देवी रोडवर शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह, सहा वर्षीय मुलगी आणि एका ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात सीमा चव्हाण (वय 24), मारिया पठाण (वय 6) आणि रूपला राठोड (वय 65) यांचा मृत्यू झाला आहे. तर इशिका चव्हाण (वय ४) ही मुलगी जखमी झाली आहे. या घटनेनेनंतर आयशर चालक फरार झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, भीषण अपघातात तीन निष्पाप लोकांचा बळी गेल्याने मंठा शहरासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन कडक शिक्षा करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसकाका Video News: ३० जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
धक्कादायक! ऑनलाइन गेमच्या नादात मुलगा पडल्याचा मेसेज आईने वाचला अन्…
उरणमध्ये पुन्हा खळबळ; एकतर्फी प्रेमातून युवतीवर जीवघेणा हल्ला…
हिट अँड रन! BMWच्या धडकेत युवकाचा मृत्यू; आरोपीला अटक…
सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…