सांगली! प्रेयसीने लव्ह स्टोरीचा केला वाईट पद्धतीने शेवट…

सांगली: कडेगाव तालुक्यात एका युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियकराने आधी प्रेमाच्या आणाभाका दिल्या, त्यानंतर ऐनवेळी लग्नाला नकार दिल्याच्या कारणातून युवतीने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

सचिन आबासाहेब तवर (वय २१) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. करिष्मा अमोल तुपे (वय १९) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. मागील काही महिन्यांपासून करिष्मा आणि सचिन प्रेम संबंधात होते. सचिनने करिष्माला लग्नाचे वचन दिले होते. पण ऐनवेळी त्याने लग्न करण्यास नकार दिला. सचिनचा या निर्णय करिष्माच्या जिव्हारी लागला आणि ती नैराश्याच्या गर्तेत गेली होती. ८ जुलै रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास करिष्माने खोलीत कुणी नसल्याचे पाहून गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच कडेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. युवतीचा मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच करिष्माने आत्महत्या का केली? एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास सुरू केला.

करिष्मा हिचे सचिनसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत खोलात जाऊन तपास केला असता सचिनने लग्नास नकार दिल्याच्या कारणातून तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले. यानंतर कडेगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत करिष्मा हिचे वडील अमोल केशव तुपे (रा. तोंडोली) यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…

सातारा! विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं; प्रेमविवाह अन् पुन्हा प्रेम…

लग्नानंतर नवरा म्हणाला, माझे एका मुली सोबत ६ वर्षापासून प्रेम संबंध…

प्रेम प्रकरण! फोन सायलेंट मोडवर अन् प्रेयसीचा झाला मोठा गैरसमज…

प्रेम! दोघे धायमोकलून रड-रड रडले अन् रेल्वेसमोर मारली उडी; एका क्षणात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!