
हडपसर पोलिसांनी रात्रीच्या वेळी लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): वयोवृध्द नागरिकास रात्रीच्या वेळी मारहाण करून जबरीने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
फिर्यादी देविदास काळे (वय ५७) हे १५/०१/२०२४ रोजी रात्री २३.०० वा. डयुटीवरुन सुटल्यानंतर घरी पायी चालत जात होते. काळेपडळ परिसरात आले असता, स्कुटीवरुन आलेल्या दोन जणांनी फिर्यादी यांचे समोर गाडी उभी करुन त्यांचे जवळ येवुन फिर्यादी यांना पैसे काढ असे म्हणून त्यांचे शर्टाचे खिशात हात घालुन त्यांना पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्यांनी लाथा व बुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादी यांचे तोंडाचा जबडा व डाव्या पायास फॅक्चर करुन गंभीर जखमी केले. त्याबाबत हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं १३९ / २०२४ भा.दं.वि. कलम ३९४,३२३,५०४, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याचे घटनास्थळ असलेले भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासपथक अधिकारी सपोनिरी अर्जुन कदळे, पोउपनिरी अविनाश शिंदे, अंमलदार प्रशांत दुधाळ, अनिरूध्द सोनवणे आणि अमित साखरे यांनी सीसीटीव्ही पाहिले. त्यामध्ये संशयीत २ जण दिसून आले. प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपासपथकास मिळालेल्या गोपनीय माहीती चे आधारे आरोपी १) रोहीतसिंग जितेंद्रसिंग टाक (वय १९ वर्ष रा. नवीन म्हाडा बिल्डींग नं १६, हिंगणमळा ससाणेनगर रोड पुणे), २) कमलेश नरेंद्र भोरे (वय २२ वर्ष रा. सदर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करून त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपींकडून त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी ही जप्त करण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक अर्जुन कदळे हे करीत आहेत
सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा व पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५, आर राजा यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर, रविंद्र शेळके, पोलिस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), संदीप शिवले यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक अर्जुन कदळे, पोलिस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमित साखरे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
पुणे न्यायालयातून पळालेल्या आरोपीस हडपसर पोलिसांनी केले जेरबंद…
मोक्का १०९! हडपसर पोलिस स्टेशन हद्दीमधील १६ जणांवर मोक्का; पाहा नावे…
Video: हडपसर पोलिसांनी गुन्हेगारांची काढली धिंड; पाहा नावे…
हडपसर पोलिस आणि सामाजिक सुरक्षा विभागाची अवैध धंद्यांवर कारवाई…
हडपसर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला जप्त…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

