
माजी सैनिकाने आईसह भाऊ, वहिनी आणि 3 चिमुकल्यांची क्रूरपणे केली हत्या…
अंबाला (हरियाणा): एका माजी सैनिकाने जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाच्या कुटुंबासह आईलाही त्याने क्रूरपणे संपवल्याची घटना घडली आहे. अंबाला परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर खळबळ उडाली आहे. फक्त शेतातल्या रस्त्यासाठी या माजी सैनिकाने सहा जणांचे जीव घेतले. या घटनेचा सध्या पोलिस तपास करत आहेत.
अंबालामधल्या नारायणगडमध्ये एका माजी सैनिकाने जमिनीच्या वादातून भयंकर हत्याकांड घडवले. रविवारी (ता. २२) रात्री ही घटना नारायणगडच्या पीर माजरी रतोर गावात घडली. जमिनीच्या वादातून माजी सैनिक भूषण याने आपला भाऊ, वहिनी, सहा महिन्यांचा पुतण्या, पाच वर्षांची पुतणी आणि आई यांची गळा आवळून हत्या केली.हरीश (वय ३५), त्याची पत्नी सोनिया (वय ३२), आई सरोपी (वय ६५), पाच वर्षांची मुलगी यशिका आणि सहा महिन्यांचा मुलगा मयंक अशी मृतांची नावे आहेत. त्याचे जखमी वडील ओमप्रकाश यांच्यावर नारायणगड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृताच्या मुलीला चंडीगडच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं; पण तिचा मृत्यू झाला.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
अंबालाचे पोलिस अधीक्षक सुरेंद्र सिंह भौरिया घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यासोबतच खून करणाऱ्या भूषणला पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत. त्याला शोधण्यासाठी छापेमारी करण्यात येत आहे.
दोन्ही भावांकडे दोन एकर जमीन होती. या जमिनीच्या रस्त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. अनेक वेळा या रस्त्याच्या मुद्द्यावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाले होते. आरोपी याचाच राग मनात ठेवून होता आणि याच रागातून त्याने भाऊ, वहिनी, आई, पुतण्या व पुतणी यांची हत्या केली.
मैत्रिणीच्या छळाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोट समोर…
हृदयद्रावक! बापलेकाने एकमेकांना घट्ट मिठी मारून रेल्वेखाली केली आत्महत्या…
पोलिसकाकाची घराजवळच गोळ्या झाडून निर्घृण हत्या…
अनैतिक संबंध! प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या…
TCS मॅनेजर सुरभी जैन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…