
पुणे शहरात पिस्टल बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): स्वःसरंक्षणासाठी बेकायदेशीर पिस्टल जवळ बाळगणा-या सराईत आरोपीस कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी येवु घातलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेकायदेशीर हत्यारे बाळगणा-या आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे तपास पथक अधिकारी सहा पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील व तपासपथक हे माहिती काढत होते. माहिती काढत असताना तपास पथकातील अंमलदार अभिजीत जाधव, विकास मरगळे यांना माहिती प्राप्त झाली की, सागर पवार नावाचा व्यक्ती न-हे भुमकर चौक श्लोक अर्पा फलॅट नं.४०१, पुणे येथे राहत असून त्याच्याकडे पिस्टल सारखे हत्यार आहे. शिवाय, तो लपवुन त्याच्या कमरेला लावुन फिरत असतो. १९/०२/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा सुमारास कात्रज ते कोंढवा रोड वरिल केसर लॉजच्या मागील रोडवर कोणाला तरी भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
सदर माहितीप्रमाणे केसर लॉज जवळ जावुन गाडी आडबाजुला थांबवुन सोबतच्या स्टाफला रोडच्या बाजुबाजुला सापळा रचुन थांबण्यास सांगितले. मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम हा कान्हा हॉटेल चौकात बसमधुन उतरुन पायी चालत केसर लॉजच्या मागील रोडवर आडबाजुस जावुन थांबला. बातमीप्रमाणे सांगितल्यावर सदर व्यक्तीस पकडण्यासाठी जात असता तो पळून जावू लागला. त्यास सोबतच्या स्टाफच्या मदतीने थोडयाच अंतरावर पकडले. सागर राजेंद्र पवार (वय ३२, रा. श्लोक अर्पा फलॅट नं. ४०१, न-हे भुमकर चौक पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याची झडती घेता त्याचे डाव्या बाजुच्या कमरेला पॅन्टच्या आत खोचलेला एक देशी बनावटीचे पिस्टल व मागील बाजुस खिशात प्लॅस्टिकच्या लहान आकाराच्या पिशवीत जिवंत काडतुसे मिळून आली.
सदरचा देशी बनावटीचे पिस्टल व काडतुस बाळगण्याचा त्याचेकडे कायदेशीर परवाना आहे का? याबाबत त्याला विचारणा केली असता, त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्याचे कब्जात मिळालेल्या देशी बनावटीचे पिस्टल व २ काडतुसे मिळून आली आहे. सदर इसमाच्या विरुध्द कोंढवा पोलिस ठाणे पुणे गुरन. १७८/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलिस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमाच्या विरुध्द भारती विदयापीठ नाशिक रोड, लष्कर, हवेली पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल आहे.
संबंधित कामगिरी पोलिस आयु्क्त अमितेश कुमार, मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलिस उप आयुक्त सो परि.०५, शाहुराव साळवे, सहा पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलिस निरीक्षक दिनेश पाटील, अमोल हिरवे, अभिजीत जाधव, विकास मरगळे, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, राहुल थोरात, सुहास मोरे, शंशाक खाडे, आशिष गरुड, रोहित पाटील यांनी केली आहे.
कोंढवा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या; पिस्टल, काडतुसे जप्त…
कोंढवा पोलिसांनी मोक्कामधील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीला कोयत्यासह केले जेरबंद…
कोंढवा पोलिसांना नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसला अन् गुन्हे केले उघड…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

