बीड पोलिस अधीक्षकांच्या घरात धक्कादायक प्रकार, पोलिस कर्मचारी निलंबित…

बीड : बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमुळे चर्चेत असून, पोलिस अधीक्षक (एसपी) नवनीत कावत यांनी अवैध धंद्यांवर लगाम घालण्यासाठी मोहीम उघडली आहे. बीडचे पोलिस अधीक्षक कावत यांच्या घरातच विचित्र प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

बीडचे पोलिस अधीक्षक कावत हे पत्नीसोबत रविवारी रात्री 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान बंगल्याच्या नूतनीकरणाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एका खोलीचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे संशय वाढला. काही वेळाने दरवाजा उघडण्यात आला आणि त्या वेळी आत गांजाचा तीव्र वास पसरलेला होता.

दरवाजा उघडणारा पोलिस शिपाई बाळू बहिरवाळ हा नशेच्या अवस्थेत असल्याचे एसपी कावत यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्वरित कारवाई करत एसपी कावत यांनी संबंधित पोलिसाची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. या वैद्यकीय चाचणीत त्याने गांजाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारानंतर बाळू बहिरवाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडला मिळाले नवीन पोलिस अधीक्षक!

बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणारे PSI रणजीत कासले ताब्यात…

बीड! अल्पवयीन मुलाला उचलून आदळलं, जागेवरच मृत्यू…

बीडमधील गँगला सुतासारखं सरळ करणार: अजित पवार

बीड पुन्हा हादरलं! प्रेमसंबंधातून युवकावर कोयत्याने सपासप वार…

बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!