परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…
जोधपूर (राजस्थान): परदेशी प्रेम प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरने सचिन मीणासोबत लग्न केले. भारतातील अंजूने पाकिस्तानी नसरुल्लासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर एका भारतीय युवा वकिलाने पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाइन लग्न केले आहे.
जोधपूरमधील वकील अरबाज आणि पाकिस्तानी अमीना यांचा ऑनलाईन निकाह झाला आहे. हे लग्न पारंपारिक पद्धतीने झाले नसले तरी यावेळी इतर सर्व प्रथा पाळण्यात आल्या. काझींनी 2 ऑगस्ट रोजी या दोघांचे ऑनलाइन लग्न लावून दिले आहे. ऑनलाइन लग्न जोधपूर आणि कराची या दोन्ही शहरांमध्ये मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखवले गेल्याची माहिती आहे.
नवरदेव अरबाजचे वडील मोहम्मद अफजल म्हणाले की, ‘पाकिस्तानातील आमच्या नातेवाईकांमार्फत आम्ही आधीच रोका केला होता. लग्नासाठी अमीनाच्या व्हिसाची वाट पाहत होतो. त्यानंतर व्हिसाच्या प्रक्रियेत विलंब झाला, म्हणून आम्ही दोघांचे ऑनलाइन लग्न करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी अमीनाला राजस्थानमध्ये लग्न करायचे होते, पण तिला व्हिसा मिळू शकला नाही. लग्नाची तारीख आधीच ठरलेली होती. त्यामुळे वर-वधू दोघांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्न करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची अमीना आणि राजस्थानचा अरबाज खान यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाह केला.’
अरबाज म्हणाला, ‘भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले असले तरी सीमेपलीकडील विवाहांचा संबंधांवर फारसा परिणाम झालेला नाही. यामागचे कारण म्हणजे दोन्ही देशांमध्ये लोकांचे नातेवाईक राहतात. आता आम्ही अमीनाच्या व्हिसाची वाट पाहात आहोत. दोघांनी विवाह केल्यामुळे व्हिसा मिळणे सोपे होईल.’
रशियन महिला देवदर्शनाला आली अन् पडली भारतीय नागरिकाच्या प्रेमात…
श्रीलंकेतील महिलेचे फेसबुकवरून जुळले भारतीय युवकासोबत प्रेमसंबंध अन्…
प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…
परदेशी प्रेम! बांग्लादेशी ‘जूली’ ‘सीमा’ ओलांडून भारतात आली अन् पुढे…
अंजूला मिळाले कोट्यावधींचे गिफ्ट अन् सुरक्षेला दोघे जण…
सीमा हैदर आणि सचिन मीनाला ATSने चौकशीसाठी घेतले ताब्यात…
पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असलेली प्रेयसी पोलिसांच्या ताब्यात…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…