पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असलेली प्रेयसी पोलिसांच्या ताब्यात…

जयपूर (राजस्थान): जयपूर विमानतळावरून पाकिस्तानात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युवती आणि तिच्यासोबत असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पाकिस्तानी सीमा हैदर भारतात पळून आली आणि तिने भारतीय सचिनसोबत लग्न केलं. त्यानंतर भारतीय अंजू पाकिस्तानात पळून गेली आणि तिने तिथे प्रियकर नसरुल्लासोबत लग्न केले. सीमा आणि अंजूची प्रेमकहाणी समोर आल्यापासून सीमेपलीकडच्या अनेक प्रेमकहाण्या समोर येऊ लागल्या आहेत. जयपूर विमानतळावरून पोलिसांनी शुक्रवारी (ता. २८) एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानला जाण्यासाठी तिकीट बुक करण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा दाखविण्यात अयशस्वी ठरल्याने तिला ताब्यात घेतले.

अल्पवयीने मुलीने दावा केला आहे की, ती मूळची पाकिस्तानातील लाहोरची रहिवासी असून तीन वर्षांपूर्वी भारतात आली होती. त्या काळात ती राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील श्रीमाधोपूर भागात तिच्या मावशीकडे राहत होती. ही अल्पवयीन मुलगी पाकिस्तानातील प्रियकराला भेटायला जात होती. मुलगी लाहोरमधील इंस्टाग्राम प्रेमी अस्लम लाहोरीला भेटायला जात होती, अशी माहिती समोर आली आहे.

अल्पवयीन मुलगी इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या पाकिस्तानी युवकाला भेटायला निघाली होती. या मुलीची लाहोरमधील अस्लम लाहोरी नावाच्या मुलाशी मैत्री झाली होती. त्याने स्वत:ला पाकिस्तानी असल्याचे सांगून लाहोरमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे मुलीने विमानतळावर पोहोचून पाकिस्तानचे तिकीट मागितले, पण तिच्याकडे पासपोर्ट किंवा व्हिसा नव्हता. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी पाकिस्तानात जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी विमानतळावर गेली होती. मुलीकडे मोबाईल किंवा ओळखपत्र आणि प्रवासासंबंधित कागदपत्रे नव्हती. संबंधित मुलगी बारावी पास आहे. पाकिस्तानातील लाहोरमधील अस्लम लाहोरी याच्यासोबत तरुणीची इंस्टाग्रामवर मैत्री झाली. त्याने तरुणीला लाहोरला भेटायला बोलावलं. त्यानंतर ही मुलगी विमानतळावर पोहोचली आणि बुरखा परिधान तिकीट काढायला गेली होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुलीने एका वर्षापासून संबंधित युवकासोबत मैत्री असल्याचा दावा केला आहे. दोघांची इंस्टाग्रामवर मैत्री झाली. इंस्टाग्रामच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात होते. मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या संदर्भात माहिती दिली. ही पाकिस्तानी नसून भारतीय असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.’

अंजूला पाकिस्तान सरकार नोकरी आणि घर देणार; शिवाय…

पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू सनकी स्वभावाची; मित्राच्या घरी थांबली…

Video: पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा…

अंजूने सीमेपलिकडून धाडला संदेश; मीडियाला केली विनंती…

प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…

सीमा हैदर आणि सचिन मीनाला ATSने चौकशीसाठी घेतले ताब्यात…

सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…

परदेशी प्रेम! बांग्लादेशी ‘जूली’ ‘सीमा’ ओलांडून भारतात आली अन् पुढे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!