प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

लखनौ (उत्तर प्रदेश) : लग्नाच्या दिवशी नवरी तयार होत असतानाच नवरदेवाने मेहुणीसोबत धुम ठोकल्याची घटना बरेलीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांसह उपस्थिताना धक्का बसला आहे. नवरदेवाचे वधूसोबतच तिच्या बहिणीसोबतही प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आले आहे. शिवाय, परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

नवाबगंज भागात राहणाऱ्या युवकाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पण, लग्नाच्या दिवशी अचानक नवरदेव आपल्या नवरीच्या धाकट्या बहिणीसोबत पळून गेल्याची माहिती समोर आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नवरदेवाचे वधूसोबत आधीचेच प्रेमसंबंध होते. दोघांच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. पण दोघांनीही घरच्यांची समजूत घातली आणि अखेर कुटुंबीय राजी झाले. प्रेमविवाह असताना सुद्धा नवरदेव मेहुणीसोबत पळून गेल्याने परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

नवरदेवाचे नवरी आणि तिची बहीण या दोघींसोबत प्रेमसंबंध होते. पण वधू आणि तिच्या कुटुंबीयांना हे माहीत नव्हते की वराचे त्याच्या भावी मेहुणीसोबतही प्रेमसंबंध आहेत. नवरदेव मेहुणीसोबत पळून गेला आहे. पण, दोघांचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र वराच्या या कृत्यानंतर वधू पक्षाने नवाबगंज पोलिस ठाण्यात वर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस वराचा आणि युवतीचा शोध घेत आहेत.

प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…

प्रेम! मामीने ठोकली भाच्यासोबत धूम अन् पुढे…

हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…

हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!