अंजूला मिळाले कोट्यावधींचे गिफ्ट अन् सुरक्षेला दोघे जण…
कराची (पाकिस्तान): भारतातून पाकिस्तानमध्ये आलेली अंजू इस्लाम धर्म स्वीकारुन फातीमा झाली आहे. शिवाय, 25 जुलै रोजी मित्र नसरुल्लासोबत लग्न केले आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंजू जोरदार चर्चेत आले.
अंजूला 24 तासांत सुमारे 1.25 कोटींचे गिफ्ट मिळाले आहेत. सोशल मीडियावर अंजू आणि नसरुल्लाचा शनिवारी एक व्हिडिओ समोर आला आहे. दोघे एका रिअल इस्टेट कंपनीच्या सीईओसोबत दिसत आहेत. नसरुल्ला आणि अंजू यांना कंपनीच्या सीईओनी निवासी भूखंड, 50,000 पाकिस्तानी रुपये आणि इतर मौल्यवान वस्तू भेट दिल्या आहेत.
पाकिस्तानच्या 5 कंपन्यांनी अंजूला नोकरीच्या ऑफर दिल्या आहेत. अंजू आणि नसरुल्ला 31 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊ शकतात. यात अंजू पाकिस्तानच्या नागरिकत्वाची मागणी करू शकते. यासोबतच ती पाकिस्तान सरकारकडे तिची मुले भारतातून आणण्याची मागणी करू शकते. अंजूच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षा कर्मचारी देण्यात आले आहेत.
Video: अंजूने पाकिस्तानातून अरविंदला फोन करून केली शिवीगाळ…
अंजूला पाकिस्तान सरकार नोकरी आणि घर देणार; शिवाय…
Video: पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा…
अंजूने सीमेपलिकडून धाडला संदेश; मीडियाला केली विनंती…
सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…