रशियन महिला देवदर्शनाला आली अन् पडली भारतीय नागरिकाच्या प्रेमात…

लखनौ (उत्तर प्रदेश): एक ३६ वर्षीय युवती भारत दौऱ्यावर देवदर्शनासाठी आली असाताना एका भारतीय नागरिकाच्या प्रेमात पडली. दोघांना लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हिंदू परंपरेप्रमाणे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर तिने आपल्या भारतीय पतीसह गोसेवाही केली.

वृंदावनला धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते. भारतातूनच नाही तर जगभरातील असंख्य भाविक येथे येत असतात. रशियामधून भारतात आलेल्या युना (वय ३६) हिची राजकरण (वय ३५ यांच्याशी भेट झाली होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. युना आणि राजकरण यांनी हिंदू परंपरेप्रमाणे लग्न केले आहे. यानंतर युनाने वृंदावनात गोसेवाही केली.

दोघंही संसारात व्यस्त असून गाईंची काळजी घेत आहेत. तसेच इस्कॉन मंदिराजवळ लोकांना अन्न देत आहेत. याशिवाय त्यांना पुस्तकं आणि चंदनही देत आहेत. राजकरण यांचे शिक्षण झालेले नाही आणि दुसरीकडे युनाला हिंदी येत नाही. मात्र तरीही दोघांमधील प्रेमाची भाषा एकमेकांना समजली आहे. लग्न झाल्यापासून, युनाने भारतीय संस्कृती स्वीकारली आहे. तिने कुंकू लावण्यापासून ते गळ्यात मंगळसूत्र घालण्यापर्यंत सर्व गोष्टी केल्या आहेत. दरम्यान, दोघांच्या विवाहाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

श्रीलंकेतील महिलेचे फेसबुकवरून जुळले भारतीय युवकासोबत प्रेमसंबंध अन्…

प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…

परदेशी प्रेम! बांग्लादेशी ‘जूली’ ‘सीमा’ ओलांडून भारतात आली अन् पुढे…

अंजूला मिळाले कोट्यावधींचे गिफ्ट अन् सुरक्षेला दोघे जण…

सीमा हैदर आणि सचिन मीनाला ATSने चौकशीसाठी घेतले ताब्यात…

पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असलेली प्रेयसी पोलिसांच्या ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!