प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…

नवी दिल्लीः पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदर हिची देशभरात चर्चा सुरू असतानाच एका भारतातील एक महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तान गाठले आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू पती आणि मुलांना सोडून लाहोरमध्ये राहत असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी तिने पाकिस्तान गाठले आहे.

अंजू हिचा विवाह 2007 मध्ये उत्तर प्रदेशमधील अरविंदसोबत झाला. ती पतीसोबत राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात राहते. पाकिस्तानात पोहोचल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक अंजूच्या घरी दाखल झाले. पोलिसांनी तिच्या पतीकडे चौकशी केली असता त्याला याबाबतची कल्पना नव्हती. अरविंदने सांगितले की, अंजू चार दिवसांपूर्वी सहलीसाठी जयपूरला जाते सांगून घरातून गेली आहे. पण, त्यानंतर ती नक्की कुठे गेली याची माहिती नाही. काही दिवसांत ती परत येईल असा विश्वास आहे. अंजू Whatsapp कॉलिंगद्वारे सतत संपर्कात आहे. रविवारीही तिने Whatsapp कॉल केला होता. अंजूने हिंदू धर्म स्वीकारला होता आणि नंतर तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. अंजूला दोन मुलं देखील आहेत.

अंजू ही लाहोरमध्ये राहणाऱ्या युवकासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत होती. त्याला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. मात्र ती पाकिस्तानात कशी पोहोचली, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, अंजू नावाची भारतीय महिला लाहोरला खैबर पख्तून परिसरात नसरुल्लाह नावाच्या तरुणासोबत राहत असल्याचे पत्र मिळालं आहे. यासंदर्भात महिलेशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अंजूचा प्रियकर नसरुल्ला खैबर हा पाकिस्तानमधील पख्तूनख्वाच्या दीर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. अंजू आणि नसरुल्लाह यांची फेसबुकवर मैत्री झाली आणि दोघेही सोशल मीडियावर बोलू लागले. यानंतर अंजूने नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानला जायचे ठरवले. घरी जयपूरला सहलीला जात असल्याचे सांगून अंजू पाकिस्तानात पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे.

अंजूच्या पासपोर्टवरील नोंदीवरून, ती 21 जुलैला व्हिजिट व्हिसावर पाकिस्तानला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय महिला पाकिस्तानात पोहचल्याने पाकिस्तानी एजन्सी अलर्ट झाली आहे. अंजू पाकिस्तानात का आली, याबाबत पाकिस्तानी यंत्रणेकडून चौकशी करण्यात आली आहे. अंजूने नसरुल्लाह याला भेटण्यासाठी आल्याचे सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!