पुणे! थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद पाहा…

पुणे: पुणे शहराच्या अनेक भागात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठा जल्लोष साजरा केला जातो. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन आज (३१ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजल्यानंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिला आहे.

पुणे शहरात रात्री बारापर्यंत शहरात येणाऱ्या जड वाहनांना शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरती देखील कारवाई करण्यात येणार आहे.

फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूकबदल पुढीलप्रमाणे:
– कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौक येथे थांबविण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळवण्यात येणार आहे.

– जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे.

– वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

– फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.

– बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक ईस्टस्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

– इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे.सरबतवाला चौकातून महावी चौकाकडे जाणारी वाहतूक करण्यात येणार आहे.

लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात बुधवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौकदरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.

पुणे शहरात ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम अन् वाहतूकीत तात्पुरता बदल…

पुणे! विजयस्तंभावर शौर्य दिनानिमित्त वाहतुकीत मोठे बदल अन् पोलिसांचे आवाहन…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!