
महाराष्ट्रात आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड; महिलेवर अत्याचार…
मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात याच्यानंतर मुंबईचा बाबा जान भोंदूचा कारनामा उघड झाला आहे. नवऱ्यावर त्याचंच स्पर्म वापरून काळीजादू केल्याचा दावा त्याने संबंधित महिलेसमोर केला. काळी जादू उतरवण्यासाठी त्याने महिलेवर वारंवार अत्याचार केले. महाड, पनवेल अशा ठिकाणी बोलावून त्याने महिलेवर अनेक वेळा शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने पोलीस तक्रारीत केला आहे.
बाबा जान उर्फ अब्दुल रशीद याने भूतप्रेत उतरवतो असे सांगून महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात पीडित महिलेने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार बाबा जान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
मुलीच्या आजारपणाला कारण हे काळीजादू असल्याचे सांगून बाबा जान याने महिलेला महाडला बोलावून पुन्हा पुन्हा अत्याचार केले. तुला भूताने झपाटल्याने तुझ्या नवऱ्याशी तुझे भांडण होत आहे. तुझी मुलगी आजारी पडत आहे. तू पण आजारी पडशील, असे सांगून त्याने महिलेला भुलवल्याचे तिने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या दरम्यान महाड, पनवेल, नवी मुंबई येथे बोलवून बाबाने अत्याचार केला, असे पीडित महिलेने पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांना मोठा धक्का…
वसईच्या भोंदू बाबा प्रकरणात नवा ट्विस्ट, पीडित महिलेवर धक्कादायक आरोप…
पुणे शहरात भोंदूबाबाने महिलेला फसवलं; सोन्याच्या हंड्यात निघाली माती…
पुणे! मोबाईल गरम झाला अन् भोंदूबाबाचं भलतंच कांड झालं उघड…
भोंदूबाबा महिलेला काही टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाला अन् खोलीमध्ये गेल्यावर…

