पुणे! महिलेने मॅट्रिमोनी साईटवर नावनोंदणी केली अन् तिथेच फसली…

पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर जोडीदार शोधणे एका महिलेसाठी (वय ४४) अत्यंत महागडे ठरले आहे. लग्नाचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका महिलेची तब्बल ५९ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Morya Misal (@moryamisal)

तक्रारदार महिला वडगावशेरी परिसरात राहते. नोव्हेंबर २०२४ मध्ये तिने एका प्रसिद्ध मॅट्रिमोनी साईटवर नावनोंदणी केली होती. तिथे ओळख झालेल्या एका व्यक्तीने महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. एकदा विश्वास निर्माण झाल्यावर चोरट्यांनी महिलेला आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. त्याने कधी वैयक्तिक अडचण, तर कधी गुंतवणुकीचे कारण सांगून महिलेकडे पैशांची मागणी केली. लग्नानंतर आपण सोबतच राहणार आहोत, या भाबड्या आशेपोटी महिलेने कोणतीही खातरजमा न करता गेल्या दीड वर्षात टप्प्याटप्प्याने तब्बल ५९ लाख ३७ हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केले.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

महिलेने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पैशांची मागणी केली असता, तिला चक्क जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्यांचे सर्व मोबाईल क्रमांक बंद करून पळ काढला. अखेर पीडित महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात धाव घेत ८ जणांविरोधात तक्रार दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! भिगवण प्रकरणातील युवतीबद्दल नवी माहिती समोर…

पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…

पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…

Cyber Crime! पुणे शहरातील सर्वात मोठा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!