वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना भीषण अपघात, दोन मुलींसह जावयाचा मृत्यू…

नाशिक : वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना वाहनाला भीषण अपघात झाला असून, दोन मुलींसह जावयाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. मालेगावच्या वाकेजवळ हा अपघात बुधवारी (ता. १०) रात्री उशिरा झाला. महामार्गावर उभा राहिलेल्या कंटेनरला कार धडकली. दोन सख्ख्या बहिणी आणि एकीच्या पतीचा मृत्यू झाला. वडिलांच्या अंत्यविधीसाठी जात असतानाच तिघांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

वडिलांचा मृतदेह रुग्णवाहिकेने अंत्यविधीसाठी कुटुंबिय मालेगावला नेत होते. त्यावेळी रुग्णवाहिकेपाठोपाठ कुटुंबिय कारने निघाले असताना कारची धडक महामार्गावर उभा असणाऱ्या कंटेनरला बसली. पहाटे चार वाजता झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक नात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावर झालेला हा अपघात इतका भीषण होता की अर्धी कार ट्रकखाली घुसलीय. अपघातानंतर घटनास्थळावरची दृश्ये थरकाप उडवणारी होती. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे मीनाक्षी अरुण हिरे, सुनंदा विकास सावंत आणि विकास चिंतामण सावंत अशी आहेत. तर अपघातात वैभवी प्रवीण जाधव ही गंभीर जखमी झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून विवाहितेचे टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमध्ये म्हटले की…

भीषण अपघात! दुधाच्या कंटेनर आणि बसमध्ये धडक; 18 जणांचा जागीच मृत्यू…

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू…

पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…

भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; आमदार म्हणतात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!