कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

सांगली: सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावातील एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासू-सूनेचा मृत्यू झाला, तर कुटुंबातीलच दोन पुरुषांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांना पुढील उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

सासू रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय 45) व सुन काजल समीर पाटील (वय 30) असे मृत महिलांची नावे आहेत. अल्लाउद्दीन मकबूल पाटील व समीर अल्लाउद्दीन पाटील यां दोघांची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी जत व कवठेमहांकाळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या कुटुंबातील चार सदस्यांनी विष प्राशन केले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नांगोळे गावामध्ये पाटील कुटुंबीयांचे ढालगाव रस्त्यालगत घर आहे. या घरामध्ये अल्लाउद्दीन पाटील, रमेजा अल्लाउद्दीन पाटील, समीर अल्लाउद्दीन पाटील, काजल समीर पाटील व दोन लहान मुले असे कुटुंबीय राहतात. या घरामध्ये पाटील यांच्या कुटुंबातील एका वयस्कर महिलेने घरातील चौघेजण निपचिप पडलेले आहेत हे पाहिल्यानंतर आरडाओरडा करून, शेजारी राहणाऱ्या सर्वांना बोलविले. घटनास्थळी सर्वांनी पाहिले असता चौघेजण निपचिप पडलेले होते.

कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी चार ग्लास मिळून आले. त्या ठिकाणी लिंबू कापून ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी सूरी देखील मिळाली. त्या ठिकाणापासून बाजूलाच जनावरांसाठी वापरले जाणारे विषारी औषध देखील पोलिसांना घटनास्थळी मिळून आले. यामुळे या चार जणांनी विषारी औषध प्राशन केले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घरातील समीर पाटील यांची दोन मुले आहेत. एक सहा वर्षाचा आहे तर दुसरा सहा महिन्यांचा आहे. या दोघांना मात्र कोणतीही विषबाधा झाली नसून दोन्ही मुले सुरक्षित आहेत.

सांगली! प्रेयसीने लव्ह स्टोरीचा केला वाईट पद्धतीने शेवट…

सांगलीत थरार! दिवसाढवळ्या पाठलाग करून कोयत्याने चिरला गळा…

सांगलीचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणादरम्यान वीरमरण…

सांगली! गर्भवती महिलेची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…

सांगली हादरली! नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा केला खून अन् हात-पाय तोडून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!