महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…

पुणेः दवाखाना बांधण्यासाठी माहेरवरून पैसे आणावेत म्हणून सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना 15 सप्टेंबर रोजी डुडुळगाव (ता. हवेली) येथे घडली होती. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीसह चार जाणांवर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. अपर्णा अभिजीत शिंदे (वय 33) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. याबाबत डॉ. अपर्णा शिंदे यांचा भाऊ घन:शाम भानुदास पवार (वय 31, सध्या रा. पुर्णानगर, पिंपरी मुळ रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी जि. नगर) यांनी दिघी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॉ. अपर्णा शिंदे यांचा पती डॉ. अभिजीत अशोक शिंदे (वय 40 रा. अमुल्यम सोसायटी डुडुळगाव), सासरे डॉ. अशोक बाबुराव शिंदे (वय 67 रा. कोल्हार भगवतीपुर ता. राहता, जि. नगर) यांच्यासह सासू आणि नणंद यांच्यावर आयपीसी 498(अ),306,323,504,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घन:शाम यांच्या बहिणीचा विवाह डुडुळगाव येथे अमूल्यम सोसायटीत राहणाऱ्या डॉ. अभिजीत शिंदे याच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यानंतर पती, सासरा, सासू, नणंद यांनी पैशांच्या मागणीसाठी छळ सुरू केला होता. दवाखाना बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी अपर्णा यांना जमिनीवर नाक घासायला लावून मारहाण केली आणि त्यांना घरातून बाहेर काढले होते. त्यानंतर, त्या 15 सप्टेंबरला सासरी गेल्या होत्या. त्यावेळी संशयितांना पुन्हा माहेरहून पैसे आणावेत यासाठी तगादा लावला. त्याला कंटाळून डॉ. अपर्णा यांनी सातव्या मजल्यावरील प्लॅटच्या बाल्कनीतून खाली उडी मारुन आत्महत्या केली. पुढील तपास दिघी पोलिस करीत आहेत.

पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…

पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…

पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…

महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!