भिक्षुकाचा अपघाती मृत्यू, गोधडीत सापडले लाखो रुपये…

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात डोणगाव रोडवर सायकलस्वार भिक्षुकाला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात दीपक मोरे हा भिक्षुक गंभीरित्या जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे असलेल्या गोधडीत लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेला भिक्षुकाची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी जाऊन तपासणी केली. त्याची सायकल, एक गोधडी आणि पिशवी आढळून आली. या गोधडीतून एक लाख 63 हजार रुपये रोख स्वरूपात मिळून आले. याशिवाय चिल्लर, विविध बँकेची पासबुक, एटीएम कार्ड आणि पॅन कार्ड देखील आढळून आले आहे.

भिक्षुकाजवळ मिळून आलेल्या पासबुकमध्ये देखील लाखो रुपयांची रक्कम जमा असल्याचे स्पष्ट झाल आहे. एका भिक्षुकाकडे लाखो रुपयाची रोकड बँकेत, लाखो रुपये आणि काही स्थावर मालमत्तेची कागदपत्रे पाहून अनेक जण चक्रावून गेले होते. पोलिसांनी या भिक्षुकाच्या कुटुंबीयांचा शोध घेत त्या कुटुंबीयांना ही संपूर्ण रक्कम बँक पासबुक आणि सर्व साहित्य सुपूर्द केले आहे. या घटनेची पसिरसारत जोरदार चर्चा सुरू आहे.

Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

मुंबईत वरळी सी लिंकवर 6 वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू…

बीडमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेतील चौघांचा तर ट्रॅव्हल्समधील सहा जणांचा मृत्यू…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!