वानवडी पोलिसांनी जागेच्या फसवणूकप्रकरणी एकाला केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): जागेचा बनावट करारनामा व कधीही रद्द न होणारे बनावट कुलमुख्त्यार तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास करत आहेत.

जयप्रकाश सिताराम गोयल (रा. तिसरा मजला सन माहु कॉम्पलेक्स ५ बंगार्डन रोड पुणे) यांनी फसवणूकीबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी हेमंत बागेरेड्डी मोटाडू (वय ६१, हा सध्या रा. बंग्लो नं. १० ईस्ट स्ट्रीट रोड युनिअन बँकेचे समोर कॅम्प पुणे) याला अटक केली आहे. शिवाय, प्रमोद चंदनलाल शर्मा (वय – ६४ धंदा-व्यवसाय रा. स.नं. ३/१० कुलश्री सोसायटी कर्वेनगर पुणे) याला २७/११/२०१७ रोजी अटक केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने फिर्यादी यांचे जागेचा बनावट करारनामा व कधीही रद्द न होणारे बनावट कुलमुख्त्यार तयार केले आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायीक असून त्यांनी २८/१०/२०१० रोजी यास्मीन फईम सय्यद यांचेकडून खरेदी खताने स.नं. ७५/२/१ मौजे वानवडी पुणे येथील जमिन खरेदी केली असुन त्याचा रजि. दस्त क्र. १०१३९/१/१७/२०१० असा आहे. सदर मिळकतीबाबत आरोपी हेमंत बागा रेड्डी मोटाडू यांनी सदर मिळकतीचे मुळ मालक रेव्हरंड फादर मार्सेलिन्सु सबस्टेडीयम न्यूनस यांचे बरोबर २६/०६/१९९७ रोजी करारनामा करून व २७/०६/१९९७ रोजी कधीही रद्द न होणारे कुलमुख्यारपत्र तयार केले असुन ते आरोपी प्रगोद चंदनलाल शर्मा यांनी नोटरी केल्याचे फिर्यादी यांना आढळुन आले. परंतु यातील आरोपी प्रमोद शर्मा यांना २१/०७/१९९७ रोजी नोटरी सनद मिळाली आहे. यावरुन आरोपी प्रमोद शर्मा यांनी त्यांना सनद मिळण्याचे पुर्वीच आरोपी हेमंत मोटाडू याचे बरोबर आपसात संगणमत करून करारनामा व कधीही रद्द न होणारे कुलमुख्यार पत्र बनावट तयार करून त्यावर बनावट शिक्के सुध्दा तयार करून ते दस्तावर उमटवून त्यामध्ये लिहीलेला दस्त खरा आहे असे भासवून फिर्यादी व शासनाची फसवणुक केली आहे. म्हणून यातील फिर्यादी यांनी आरोपी विरुध्द तक्रार दिल्याने सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर वानवडी पोलिस स्टेशनला येऊन कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…

पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…

पुणे पोलिसांनी चोरी व गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना केले परत…

ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह! पुणे शहरात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाने दोघांना उडवले…

सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!