अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर आला आहे. दोन पानांच्या या एफआयआर कॉपीमध्ये आरोपीने एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर सैफ अली खान याच्या स्टाफने तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने एक कोटी रुपयांची मागणी केली.

सैफ अली खानच्या घरात आलेल्या आरोपीला तुला काय हवं आहे? असं विचारण्यात आले तेव्हा त्याने पैसे हवे आहेत, असे सांगितले. यानंतर किती पैसे हवे आहेत? असे विचारल्यावर त्याने एक कोटी रुपयांची मागणी केली. यानंतर आरोपीने सैफ अली खानच्या मोलकरणीवर हल्ला केला. आरोपीने मोलकरणीच्या दोन्ही हातांवर चाकूने वार केले. सैफ अली खान याच्यावर हल्ला करून आरोपी त्याच्या बिल्डिंगमधून फरार झाला. बिल्डिंगमधून पळून जातानाचा त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज 6व्या मजल्यावरील आहे. हल्लेखोराने सैफ अली खानवर 12 व्या मजल्यावर हल्ला केला. सैफ अली खान 12व्या मजल्यावरच राहतो. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर हा हल्ला केला होता.

हल्लेखोराला सर्वात प्रथम करिना कपूर हिने पाहिले. रात्री 1.30 वाजता करिना पार्टीवरून घरी परत आली, तेव्हा घरात येताच करिनाला हॉलमध्ये एक व्यक्ती दिसली. यानंतर करिनाने आरडाओरडा सुरू करताच मोलकरीण बाहेर आली. यावेळी चोराने मोलकरीणीवर हल्ला केला. यानंतर करिना तैमुरला घेऊन बेडरूमच्या दिशेने पळाली.

सैफ अली खानच्या घरी गेल्या दोन दिवसांपासून फ्लोअरिंग आणि फिनिशिंगचे काम सुरू होते. यासाठी 3 कामगार काम करत होते. काल काम झाल्यानंतर त्यापैकी एक जण घरातच लपला होता. करिनाने आरडाओरडा सुरू करताच सैफ अली खान बेडरूममधून पळत आला. तेव्हा मोलकरीण आणि चोराची झटापट सुरू होती, त्यामुळे सैफ मोलकरीणाला वाचवायला गेला, तोच चोराने सैफच्या हातावर चाकूने हल्ला केला. जखमी झालेला सैफ मागे होताच चोराने सैफच्या पाठीत आणि मानेवर वार केला. यानंतर चोर मुख्य दरवाजाने पळून गेला. यानंतर करिना सैफला घेऊन तात्काळ हॉस्पिटलमध्ये गेली.

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…

अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या चालकाला अपघात प्रकरणी केली अटक…

साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला कोठडी…

अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्या बहिणीला अटक; प्रियकराला जिवंत जाळलं…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे…

प्रेम प्रकरण! अभिनेत्रीला पोलिसांनी घेतले ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!