
भोंदूबाबा व्यापाऱ्याला बंद खोलीत घेऊन गेले अन् शुद्धीवर आल्यावर बसला धक्का…
मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला पेढा खाणं महागात पडलं आहे. पेढा खाल्ल्यानंतर व्यापाऱ्याला ५० गमावावे लागले आहेत. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्यानं तातडीनं समतानगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
कैलास चौधरी (रा. कांदिवली) असे तक्रारदार व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचा किराणा मालाचा व्यवसाय आहे. झटपट पैसे दुप्पट करण्याच्या मोहामुळे त्यांना ५० लाख रुपये गमवावे लागले आहेत. पाच जणांनी घरात पुजापाठ आणि हातचलाखी करून व्यापाऱ्याला गंडा घातला आहे. व्यापारी कैलास चौधरी यांनी समतानगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, कांदिवली परिसरात ओम एन्टरप्रायजेस नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. यातून त्यांची चांगली कमाई होत होती. मात्र त्यांना त्यांच्या प्रमोद डब्बू नावाच्या मित्रानं झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवले. एकेदिवशी प्रमोद डब्बू चौधरी यांच्या दुकानावर साहित्य घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याने शिवकुमार यादव आणि त्याचे काही सहकारी झटपट पैसा दुप्पट करुन देतात म्हणून सांगितलं.
चौधरी यांचा प्रमोद यांच्यावर फारसा विश्वास नव्हता. पण आधी प्रात्यक्षिक बघा मग पैसे द्या, असे प्रमोदने कैलास चौधरी यांना सांगितले. त्यानुसार प्रमोद कैलास चौधरी यांना ऑक्टोबर महिन्यात गोरेगाव येथे घेऊन गेला होता.एका खोलीत सूर्यबाबा, शिवकुमार यादव आणि त्यांचे काही साथीदार बसले होते. ज्यांना प्रात्यक्षिक बघायचं असेल त्यांनी वहीत पैसे ठेवावे आणि शांत बसावे, असे सूर्यबाबाने सांगितले. त्यानुसार कैलास चौधरी यांनी आपल्या खिशातील शंभर-दोनशे रुपये वहीत ठेवले. यावेळी भोंदुबाबाने हातचलाखी करत हे पैसे दुप्पट केले. हा प्रकार पाहिल्यानंतर कैलास यांना विश्वास बसला.
चौधरी यांनी आपल्याजवळील पैसे दुप्पट करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्याजवळील ३० लाख आणि मित्र व नातेवाईकांकडून घेतलेले २० लाख असे एकूण ५० लाख रुपये शिवकुमार यादवला दिले. पैसे दुप्पट करण्याच्या बाहण्याने आरोपींनी एका बंद खोलीत पूजापाठ करण्याचे ठरवले. पूजापाठ झाल्यानंतर आरोपींनी चौधरी यांना एक पेढा खायला दिला. पण पेढा खाल्ल्यानंतर अवघ्या काही सेकंदात चौधरी बेशुद्ध झाले. यानंतर आरोपींनी भोंदुबाबा, शिवकुमार यादव आणि इतरांनी पैसे घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. चौधरी शुद्धीवर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्याकडे एक रुपयाही उरला नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी समतानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! पुणे-नगर महामार्गावरील वाघोली येथे डंपरने ९ जणांना चिरडलं; पाहा नावे…
हृदयद्रावक! सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात जागीच मृत्यू; पाहा नावे…
कल्याण मारहाण प्रकरण! मुख्य आरोपी शुक्लानंतर आणखी तिघांना बेड्या…
मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video…
धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…

