पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पुणे: पुण्यातील युवकाचे अपहरण करून २५ लाख रूपये खंडणी मागणाऱ्या टोळीला सांगली येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
कोंढवे धावडे येथील वैभव श्रीकृष्ण जाधव (वय २७) यांच्या घरात घुसून त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्याबाबत उत्तमनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील आरोपी अक्षय मोहन कदम हा अपहरण केलेल्या वैभव जाधव यांच्या पत्नीला नेपाळ देशातील मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअप कॉल करून वैभवला सुखरूप सोडायचे असेल तर २५ लाख रूपये दे नाहीतर त्याचे बरे वाईट करू अशी धमकी देत होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून उत्तमनगर पोलिस स्टेशन मधील ए.टी.सी पथकातील संग्राम केंद्रे यांनी मोबाईल चे तांत्रिक विशलेषण करून आरोपी हे सांगली येथे असल्याची माहिती प्राप्त केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सदर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सांगली येथे पोलिस पथक रवाना केले. त्यानंतर तांत्रिक विशलेषणानुसार संग्राम केंद्रे यांना अपहरण केलेली गाडी ही पुण्याच्या दिशने येत असल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ एक पथक खेड शिवापुर टोल नाका येथे लावून गाडीला व आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीअंती अपहरण केलेला वैभव हा तासगाव सांगली येथे असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सपोनि उमेश रोकडे, किरण देशमुख, समीर पवार, अनिरूध्द गायकवाड असे पोलिसांचे एक पथक सांगलीला रवाना केले. तासगाव सांगली येथे जावून फिल्मी स्टाईल प्रमाणे तपास करून गुन्हयातील आरोपी असलेल्या अक्षय मोहन कदम, विजय मधुकर नलावडे, प्रदिप किसन चव्हाण, महेश नलावडे, अमोल मोरे, रणजित भोसले (सर्व रा.तासगाव सांगली) यांना व सांगली येथे गावाच्या बाहेर एका बंद पत्र्याच्या खोलीमधून अपहरण केलेल्या वैभव जाधव याला शिताफीने ताब्यात घेतले. अटक केलेल्यांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. अपहरण केलेला वैभव जाधव याची सुखरूप सुटका करून त्यांची पत्नी पुनम जाधव हिच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची उल्लेखखनीय कामगारी ही अपर पोलिस आयुक्त प्रविण पाटील, पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, सहा. पोलिस आयुक्त भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर, पोनि अजय वाघमारे, सपोनि उमेश रोकडे, किरण देशमुख, संग्राम केंद्रे, समीर पवार, ज्ञानेश्वर तोडकर, अनिरूध्द गायकवाड, सागर हुवाळे व खंडणी विरोधी पथक १ व २ यांनी केली आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उप निरीक्षक शितल अनुसे करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला खून अन् मृतदेह लपवला…
बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…
पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…
पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…
पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…