हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…
पुणे : रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला रस्त्यातच मृत्यूने गाठल्याची हृदयद्रावक घटना पुणे-पानशेत रस्त्यावर घडली आहे. संस्कृती प्रदीप पवार (वय १२) असे मृत बहिणीचे नाव आहे. ती पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड सीटीजवळ राहत होती.
पुणे शहरातील नांदेड सीटी परिसरात राहणारे प्रदीप पवार हे रक्षाबंधन सोहळ्यासाठी पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न, मुलगी संस्कृती आणि बहीण सुनीता यांच्यासह कुटुंबासह मूळ गावी पानशेत येथे निघाले होते. त्यांची कार कुरुण बुद्रुक गावाजवळ माऊली मंदिराजवळ आली असता अचानक गाडीचा टायर फुटल्याने प्रदीप यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन धरणाच्या पाण्यात पडली. ही घटना बुधवारी (ता. 30) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रदीप पवार, अर्चना पवार, प्रद्युम्न पवार, सुनीता शिंदे हे बचावले. पण, संस्कृती मोटारीमध्येच अडकून राहिली. रात्री उशिरा संस्कृतीचा मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात बचाव अधिकाऱ्यांना यश आले. रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वेल्हे पोलिस ठाण्यात स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाची अवस्था पाहून बहिणीने फोडला हंबरडा…
बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…
हृदयद्रावक! कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली अन् लेकराचा बळी…
हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…